Stock Market Update:कशी असेल बाजाराची दिशा जाणून घ्या तज्ज्ञांकडून सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४२९.४५ व निफ्टी १२५.३५ अंकाने उसळला बँक निर्देशांकासह स्मॉलकॅपची कमाल!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात चांगली वाढ झाली आहे.युएस,आशिया बाजाराबरोबरच गिफ्ट निफ्टीत ३० अंकाहून अधिक वाढ झाल्यानंतर बाजाराला सुरूवात चांगली लाभली आहे.तज्ञांनीही काल बाजारातील 'हिरवा' रंग कायम राहू शकतो असे सूतोवाच केले होते.याच पार्श्वभूमीवर आज सुरूवातीच्या कलात सेन्सेक्स (Sensex) निर्देशांकात ४२९.४५ अंकांने वाढ होत पातळी ८२४८९.१० पातळीवर पोहोचली आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांक १२५.३५ अंकांने वाढत २५१६९.९५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २४३.३८ अंकाने वाढ झाली असून बँक निफ्टीत १०७.१० अंकाने वाढ झाली आहे.सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६१%,१.११% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५२%,१.०९% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये जवळपास सगळ्याच समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ ही मिडस्मॉल हेल्थकेअर (०.८७%),एफएमसीजी (०.७०%),आयटी (०.७६%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.८७%), मिडस्मॉल आयटी व टेलिकॉम (०.६५%) या समभागात (Shares) झाली आहे.


काल इराण व इस्त्राईल यांच्यातील युद्धाविरामामुळे बाजारातील तणाव संपूर्णपणे निवळला गेला आहे. याचे सलग दुसऱ्यांदा पडसाद अमेरिकन बाजारातही पहायला मिळाले होते. युएस बाजारातील डाऊ जोन्स (Dow Jones) हा ०.०८%, एस अँड पी ५०० (S&P500) १.११%, नासडाक (NASDAQ) १.४३% इतकी वाढ झाली होती. तर आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.४७%) सह निकेयी (Nikkei 225) हा ०.०४%, हेंगसेंग (Hengseng)०.२८%,शांघाई कंपोझिट (०. २८%) या बाजारात वाढ झाली होती. भारतीय बाजारातील मजबूत 'फंडामेंटल'चा फायदा आजही कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः एस अँड पी ग्लोबलने भारताच्या जीडीपीचे सकारात्मक चित्रण उभारल्यानंतर तसेच क्षेत्रीय विशिष्ट शेअर्समध्ये केलेल्या चांगल्या कामगि रीनंतर तसेच आयपीओतील तुलनात्मकदृष्ट्या संमिश्र प्रतिसाद बघता बाजारातील आज तेजी अखेरपर्यंत पहायला मिळेल का हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे आजही स्मॉलकॅपमध्ये तेजी कायम असल्याने बँक निर्देशांकासोबत स्मॉलकॅपमुळे बाजाराला सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली आहे.


काल सोन्याच्या व कच्च्या (Crude) तेलाच्या घसरणीनंतर बाजारातील परिस्थितीवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला होता.मात्र काल युएस फेडदर रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याच्या निर्णयाला प्रतिक्षा आहे.वेट अँड वॉचचा पवित्रा बँक अध्यक्ष जेरोमी पॉवेल यांनी घेतल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आजची भूमिकाही बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते.


आज सकाळच्या सत्रात ग्राविटा इंडिया (६.७१%),जनरल इन्शुरन्स (५.४८%),इंडियामार्ट (५.२६%),जेपी पॉवर (४.४४%),न्यू इंडिया इन्शुरन्स (४.०९%),नेटवेब टेक्नॉलॉजी (३.७५%),एमसीएक्स (३.१३%),रामकृष्ण फोर्ज (३.०१%),साई ला ईफ (२.८६%),आरबीएल बँक (२.०८%),सोनाटा सॉफ्टवेअर (२.६७%),कल्याण ज्वेलर्स (२.७१%),इंडियन हॉटेल्स (२.६७%), होंडाई मोटर्स (१.७२%),इन्फोऐज (१.६९%),जेएसडब्लू एनर्जी (१.३६%),टायटन कंपनी (१.२४%),आयआरए फसी (१.१८%),गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (१.१२%),बजाज हाउसिंग फायनान्स (१.११%) या समभागात वाढ झाली आहे. तर सर्वाधिक घसरण डेटा पॅटर्न (१.१४%),एलटी फूड (०.९८%),सिमेन्स (०.७७%),मुथुट फायनान्स (०.६४%),भारत इलेक्ट्रॉनिक (०.४३%),सिमेन्स एनर्जी (१.०२%),कोटक महिंद्रा (०.३०%),आयशर मोटर्स (०.४२%),एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.१४%),इंटरग्लोब एव्हिएशन (०.१४%),वेदान्ता (०.०८%),सनटीव्ही (०.४९%), युनियन बँक (०.२७%),स्विगी (०.१५%)या समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील सुरूवातीच्या सत्राबद्दल भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'पश्चिम आशियाई संकटासारख्या मोठ्या आव्हानांना न जुमानता अलिकडच्या बाजारातील ट्रेंडचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता.भारत-पाकमधील अल्पकालीन संघर्षादरम्यानही बाजार लवचिक राहिला आहे.या लवचिकतेत एक महत्त्वाचा वाटा हा संकटादरम्यान एफआयआयने खरेदी केला आहे.वि शेष म्हणजे,संकट संपल्यानंतर कालप्रमाणेच एफआयआय विक्री करत आहेत. दुसरीकडे, म्युच्युअल फंडांमध्ये सतत येणाऱ्या प्रवाहामुळे डीआयआय बाजारात सतत खरेदीदार राहिले आहेत. एफआयआय मूल्यांकनाच्या चिंतेवर विक्री कर त असतानाही यामुळे बाजारात लवचिकता येईल. फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या ताज्या भाष्यावरून असे दिसून येते की शुल्कांवरील अनिश्चिततेमुळे चलनवाढीचा धोका आहे,म्हणूनच वर्षाच्या अखेरीस दर कपात होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसमोर आता मुख्य आव्हान म्हणजे योग्य वाढ-मूल्य मिश्रण असलेले स्टॉक शोधणे कारण वाढीचे स्टॉक खूप मूल्यवान आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भांडवली बाजारासारख्या विभागांमधील स्टॉक,विमान वाहतूक, दूरसंचार सारख्या देशांतर्गत वापर आणि हॉटेल,ऑटोमोबाईल्स आणि दागिने यासारख्या प्रीमियम वापराचे आश्वासन आहे.'


बाजारातील निफ्टीवर प्रतिक्रिया देताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,' २५२०० च्या पहिल्या उद्दिष्टाचा टप्पा ओलांडल्यानंतर निफ्टीने काही वेळातच माघार घेतली असली तरी,२४९४० च्या आमच्या प्रमुख इंट्राडे पिव्होटच्या वर यशस्वी बंद झाल्यामुळे आम्हाला वरच्या आशा जोपासण्यास प्रोत्साहन मिळते.असे म्हटले जात आहे की,गतीचा अभाव आहे आणि २५४६० पर्यंत थेट धक्का दिसणार नाही.२५१७० च्या पुढे जाण्यास असमर्थ असल्यास एकत्रीकरण किंवा घसरण होण्याची अपेक्षा करा'.


एकूणच, आजच्या बाजारातील परिस्थितीकडे पाहता मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये तसेच बँक निफ्टीकडे बाजाराचे विशेष लक्ष असू शकते असे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.

Comments
Add Comment

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

नवी मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि