Shubhanshu Shukla : पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा!

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ प्रवासावर गेले आहेत. त्यांच्या यशस्वी मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे आम्ही स्वागत करतो.



भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय बनण्याच्या मार्गावर आहेत. ते त्यांच्यासोबत १.४ अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा घेऊन जात आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशासाठी शुभेच्छा," पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभांशु शुक्लांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या आहेत. १९८४ नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे शुभांशू हे पहिले भारतीय आहेत. ते इस्रोच्या गगनयान मोहिमेचा भाग आहेत. त्यांची अ‍ॅक्सिओम-०४ मोहिमेसाठी निवड झाली आहे.जी भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन प्रक्षेपित करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या