‘माझी टीएमटी ॲप’ला प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद

ठाणे  : प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत जानेवारी महिन्यापासून माझी टीएमटी ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनचा वापर ६३ हजार ८४० प्रवाशांनी केला असून या ॲप्लिकेशनद्वारे दररोज ५ ते ६ हजार प्रवासी तिकीट काढत आहेत. यामुळे टिएमटीचे हे ॲप्लिकेशन प्रवाशांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर तिकीट्यांच्या सुट्टे पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद टळत आहेत.


ठाणे शहरातील विविध भागात परिवहन सेवेच्या बस गाड्या प्रवासी वाहतूक करतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सुट्ट्या पैशांच्या कारणावरून अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात. वाहकाकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना उर्वरित पैसे प्रवाशांना देताना अनेक अडचणी येतात. सुट्टे पैसे नसल्यामुळे काही वेळेस प्रवाशाचा बसथांबा आला तरी वाहकाला उर्वरित पैसे देणे शक्य होत नाही. त्यावरूनही प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होता.


यामुळेच तिकीटासाठी सुट्टे पैसे द्या, अशी सुचना वाहकाकडून बसमधील प्रवाशांना वारंवार सुचना केली जाते. परंतू, अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा खटके उडताना दिसतात. यावर पर्याय म्हणून डिजीटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती.


या मागणीनुसार ठाणे महापालिका परिवहन विभागामार्फत जानेवारीपासून ‘माझी टीएमटी’ ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले. या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकिट काढता येत आहे. यामुळे प्रवाशांचा वाहकासोबत सुट्टे पैसे देण्यावरून होणारा वाद टळत आहे. प्रवाशांना ॲपवर बसमध्ये बसण्याचे ठिकाण आणि इच्छीत स्थळी उतरण्याचे ठिकाण, याची नोंद केल्यानंतर तिकीट दर दाखविले जाते.


त्यानुसार, प्रवाशांना तिकीटाचे दर ऑनलाईन स्वरुपात भरायचे असतात. या ॲप्लिकेशनवरुन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढणे सोयीस्कर आणि सोपे झाले आहे. त्यामुळे मोठ्यासंख्येने प्रवासी या ॲप्लिकेशनचा वापर करत आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत ६३ हजार ८४० प्रवासी या ॲप्लिकेशनचा वापर केल्याची माहीती समोर आली आहे. या ॲप्लिकेशनवरुन दिवसाला ५ ते ६ हजार प्रवासी तिकीट काढत असल्याची माहिती ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून