लो सोडा टॅब्युलर अॅल्युमिनामध्ये भारतीय कंपनीचा पहिल्यांदाच प्रवेश
मुंबई: आदित्य बिर्ला समूहाची धातू निर्मितीतील प्रमुख कंपनी हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडने १२५ दशलक्ष डॉलर्सच्या उद्यम मूल्यात स्पेशालिटी अॅल्युमिनाची प्रमुख उत्पादक (Manufacturer) असलेल्या अमेरिका स्थित ॲल्युकेम कंपनीज आयएनसी (AluChem Companies INC) या कंपनीमधील १०० टक्के भागभांडवली हिस्सा (Stake) संपादित करत असल्याची आज घोषणा केली. हिंडाल्कोची पूर्ण मालकीची उपकंपनी आदित्य होल्डिंग्ज एलएलसीद्वारे हा संपादन व्यवहार पूर्ण केला जाईल. हे धोरणात्मक संपादन म्हणजे स्पेशालिटी अॅल्युमिनामध्ये हिंडाल्कोची एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे,जी तिच्या उच्च-मूल्य, तंत्रज्ञान-नेतृत्वाखालील साहित्य भांडारात विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हिंडाल्कोच्या स्पेशालिटी अॅल्युमिना व्यवसायाने,त्यांच्या मूल्यवर्धित धोरणाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ,अलिकडच्या वर्षांत सातत्याने दुहेरी अंकांतील वाढ केली आहे आणि कंपनीच्या उत्पादन ताफ्यामध्ये उच्च-वृद्धी,उच्च-मार्जिन असणारी व्यवसाय श्रेणी म्हणून उदयास आले आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी,सेमीकंडक्टर आणि प्रीसिजन सिरॅमिक्स सारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये स्पेशालिटी अॅल्युमिनाचे नवनवीन अनुप्रयोग शोधले जात असल्याने,हे संपादन हिंडाल्कोला नाविन्यपूर्ण वळणावर घेऊन जाणारे ठरेल.पुढील पिढीच्या अॅल्युमिनाच्या वापरापर्यंत प्रवेश सक्षम करणारे आणि मूल्य-अभिवृद्धीत वाढीला ते चालना देईल.
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले,' मूल्यवर्धित,उच्च-तंत्रज्ञान सामग्रीमध्ये नेतृत्व स्थान निर्माण करण्याच्या आमच्या जागतिक धोरणात हे संपादन एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्पेशालिटी अॅल्युमिना क्षेत्रात आमचा धोरणात्मक प्रवेश केवळ भविष्यासाठी तयार,शाश्वत उपायांच्या विकासाला गती देणार नाही तर उच्च-प्रभाव वाढीच्या संधींचा पाठलाग करण्यासाठी नवीन मार्ग देखील उघडेल. आमच्या मूल्य साखळीत प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करून आम्ही आत्मनिर्भरता,आयात-पर्यायी उत्पादनाची प्रतिस्थापना आणि नवोपक्रम-नेतृत्वाखालील व्यवसायांमध्ये प्रमाण वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देत आहोत.'
या विकासावर भाष्य करताना, हिंडाल्को इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पै म्हणाले,' हे संपादन पुढील पिढीतील अॅल्युमिना अनुप्रयोगांमध्ये आमच्या क्षमतांना बळकटी देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.गंभीर आणि स्वच्छ-तंत्रज्ञान क्षेत्रात अॅल्युमिनाचा वापर वाढत असताना, अॅल्युकेमच्या प्रगत रसायनशास्त्र क्षमतांद्वारे या वेगाने विकसित होणाऱ्या बाजारपेठांना सेवा देण्याची आमची व्यवसाय क्षमता लक्षणीयरीत्या वाढविली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, नफा वाढविणाऱ्या आणि आमची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणाऱ्या विविध उत्पादनांसह आमचा उच्च मूल्यवर्धित उत्पादन भांडाराला अधिक सखोलता त्यातून मिळविता येईल. हे नाविन्यपूर्णतेला पाठबळ आणि या क्षेत्रात जागतिक पदचिन्हाचा विस्तार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देणारेच ठरते.'
ओहायो आणि आर्कान्सासमधील तीन प्रगत उत्पादन सुविधांमध्ये वार्षिक ६०,००० टन क्षमतेसह अॅल्युकेम हिंडाल्कोला उत्तर अमेरिकेतील बाजारपेठे मजबूत उपस्थिती मिळवून देते.ही कंपनी अल्ट्रा-लो सोडा कॅल्साइंड आणि टॅब्युलर अॅल्युमिना यांची दीर्घकाळापासून पुरवठादार आहे. ही अशी सामग्री आहे जी उच्च अचूक यांत्रिक घटकांमध्ये अत्याधुनिक अनुप्रयोगांमध्येच तसेच ऊर्जाप्रवण औद्योगिक रिफ्रॅक्टरीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या अपवादात्मक औष्णिक आणि यांत्रिक स्थिरतेसाठी ओळखली जाणारी ती महत्त्वपूर्ण साहित्य आहे.
हिंडाल्को इंडस्ट्रीजच्या अॅल्युमिना व्यवसायाचे सीईओ सौरभ खेडेकर म्हणाले,' या संपादनामुळे हिंडाल्कोसाठी बाजारपेठेतील प्रवेश आणि उत्पादन पोर्टफोलिओ विस्तारासह तात्काळ सहकार्याची कवाडी खुली झाली आहेत. हिंडाल्को अॅल्युकेमच्या उच्च कार्यक्षमता तंत्रज्ञान उपायांसोबत काम करण्याची आणि जागतिक बाजारपेठेत मोठा वाटा वाढविण्यासाठी अल्ट्रा-लो सोडा अॅल्युमिना सामग्रीचे उत्पादन वाढवण्याची योजना आखत आहे.या संपादनामुळे भविष्यासाठी तयार आणि ग्राहक-केंद्रित अशा एंड-टू-एंड अॅल्युमिना उपायांची प्रस्तुती करण्याची आमची क्षमता अधिक मजबूत झाली आहे.”
अॅल्युकेम कंपनीज इन्कचे संस्थापक रोनाल्ड पी.झॅपलेटल अॅल्युमिना म्हणाले,' हिंडाल्कोसोबतची ही भागीदारी अॅल्युकेमला उत्तर अमेरिकेत जलद गतीने वाढ आणि विस्तार निर्माण करण्याची क्षमता आणि भांडवल मिळवून देईल.अॅल्युकेम ला तिच्या जागतिक दर्जाच्या शाश्वतता आणि सुरक्षितता मानके आणि पद्धती यांचा,एकात्मिक कार्यान्वयनाची उपलब्धता आणि सातत्यपूर्ण,विश्वासार्ह कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीचा फायदा होईल.संशोधन आणि विकास क्षमता आणि प्रतिभावान कार्यबलाचा फायदा घेण्याची क्षमता आमच्या नवोन्मेष-पूरक वाटचालीत प्रचंड मूल्य जोडणारे ठरते,ज्यामुळे उत्तर अमेरिकेच्या पलीकडे बाजारपेठ विस्तारण्यास आम्हाला मदत होते.'
सिरॅमिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सपासून ते एरोस्पेस आणि वैद्यकीय अनुप्रयोगांपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये तयार केलेल्या उपायांची मागणी वाढत असल्याने,जागतिक स्पेशालिटी अॅल्युमिनाची बाजारपेठ लक्षणीयरीत्या वाढण्याचा अंदाज आहे. हिंडाल्को कडे सध्या ५०० हजार टन स्पेशालिटी अॅल्युमिनाची उत्पादन क्षमता आहे आणि आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ती १० लाख टनांपर्यंत वाढविण्याचे तिने उद्दिष्ट ठेवले आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. औपचारिक अटी आणि नियामक मंजुरींच्या अधीन राहून हा संपादन व्यवहार येत्या तिमाहीत पूर्ण होण्याची अशी कंपनीची अपेक्षा आहे. हिंडाल्को अल्युमिनियम,तांबे आणि स्पेशालिटी अॅल्युमिना आणि त्यांचे डाउनस्ट्रीम यामध्ये मूल्यवर्धित धोरण पुढे नेत असताना, तिने केलेले हे संपादन नावीन्यपूर्णता,शाश्वतता आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादनाद्वारे चांगल्या भविष्याच्या अभियांत्रिकीमध्ये एक निर्णायक पाऊल ठरेल.
हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड ही आदित्य बिर्ला ग्रुपची धातूंची प्रमुख कंपनी आहे.२८ अब्ज डॉलर्सची धातूंची पॉवरहाऊस असलेली ही कंपनी उत्पन्नाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी अल्युमिनियम कंपनी आहे आणि तांबे आणि स्पेशॅलिटी अॅल्युमिनामधील एक प्रमुख जागतिक खेळाडू आहे.१० देशांमध्ये आणि ५२ उत्पादन ठिकाणी कार्यरत असलेली,हिंडाल्को ही खाणकामापासून ते तयार उत्पादनांपर्यंत पूर्णपणे एकात्मिक खेळाडू आहे आणि तिच्या उपकंपनी नोव्हेलिसद्वारे फ्लॅट-रोल्ड अल्युमिनियम उत्पादनांमध्ये जागतिक आघाडीवर आहे. ती भारतातील तांबे उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी देखील आहे.
अॅल्युकेम कंपनी नक्की काय करते?
ही कंपनी उत्तर अमेरिकेतील एक विशेष अल्युमिना उत्पादक कंपनी आहे ज्याला औद्योगिक अनुप्रयोगांसाठी उच्च-कार्यक्षमता असलेले अल्युमिना वितरित करण्याचा ४५ वर्षांहून अधिक काळचा वारसा आहे.तिच्या उत्पादन श्रेणीमध्ये रेफ्रेक्ट्रीज,सिरेमिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या कठीण वातावरणात वापरल्या जाणाऱ्या कॅल्साइंड, रिअॅअक्टिव्ह आणि टॅब्युलर अल्युमिना समाविष्ट आहेत. कंपनी ओहायो आणि आर्कान्सासमध्ये तीन उत्पादन सुविधा चालवते.