भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस! अ‍ॅक्सिओम ४ आज अंतराळात झेपावणार

तांत्रिक कारणामुळे यापूर्वी ६ वेळा मोहीम ढकलली होती पुढे


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अ‍ॅक्सिओम ४ मिशन आता २५ जून रोजी प्रक्षेपित होणार असल्याची माहिती अमेरिकन नासाकडून देण्यात आली आहे. या मिशनमध्ये भारतासोबत हंगरी आणि पोलंड या देशांचाही सहभाग आहे. हे मिशन तिन्ही देशांसाठी ऐतिहासिक मानले जात आहे. भारतासाठी हे मिशन खास आहे, कारण अनेक वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात झेप घेणार आहे.


अ‍ॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून होणार आहे. नासाने सांगितले की, ही अंतराळ मोहीम २५ जून रोज भारतीय वेळेनुसार दुपारी १२.०० वाजता स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाईल. मात्र, यापूर्वी या अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले आहे. सुरुवातीला ही मोहीम २९ मे रोजी प्रक्षेपित होणार होती परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती पुढे ढकलण्यात आली.


अ‍ॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला तसेच पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अ‍ॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.

भारतीय हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला तीन इतर क्रू मेंबर्ससोबत स्पेस मिशन, Axiom-4 चा भाग बनण्यासाठी तयार आहे. हे मिशन म्हणजे भारतासाठी एक मैलाचा दगड ठरेल. Axiom-4मिशनची क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास करणार आहे. १४ दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक प्रसार आणि व्यावसायिक उपक्रमांबाबत संशोधन होणार आहे.

मिशन अ‍ॅक्सिओम स्पेसच्या 'Axiom-4' मोहिमेअंतर्गत लाँच केले जाईल. ज्याला 'मिशन आकाश गंगा' असेही म्हटले जात आहे. Axiom-4 (अ‍ॅक्स-४) मध्ये,चार देशांचे चार अंतराळवीर १४ दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत.शुभांशू हे आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. यापूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता.
Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार

दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज, महिला घाबरली आणि पोलिसांना दिली माहिती

दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : हल्ल्याचे संपूर्ण ब्लूप्रिंट आले समोर !

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक