आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप


मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक मांत्रिकांच्या आरोपांपर्यंत पोहोचलाय. आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तंत्र-मंत्राचा खेळ रचला. हा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेला आरोप निव्वळ खळबळजनक नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा आहे.


तीन वर्षापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यात शिंग पुरल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखिल आपण वर्षावर प्रवेश केला तेव्हा तेथे टोपलीभर लिंबू सापडल्याचे सांगितले होते.



आता रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच गोळी झाडलीय. हैद्राबादहून खास मांत्रिक मागवून तो दोन दिवस मातोश्रीवर बसवला आणि पुढे पाच दिवस खोपोली येथील बंगल्यावर ठेवण्यात आला… याचं कारण? आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून!.. कदमांचा हा दावा गंभीर आहे आणि त्यांनी यावर फोटो, नाव, पुरावे देण्याची तयारीही जाहीर केलीय. शिवाय हे सगळं ठाकरे गटाचा खास खासदार करून गेला, असंही कदम म्हणालेत.



मग आता प्रश्न असा की, हे सगळं जर खोटं असेल, तर ठाकरे गट गप्प का? आणि जर खरं असेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट कोणत्या अंधाऱ्या रस्त्यावर जातेय?


भास्कर जाधवांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना रामदासभाई म्हणाले, मी पुराव्यासकट बोलतो, "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल", आम्ही हवेत तलवारी चालवत नाही. तुम्हाला कावीळ झालेली असेल, म्हणून तुम्हाला सगळं पिवळं वाटतं.. असं म्हणून त्यांनी भास्कर जाधवांनाही झाप झाप झापलं.


याआधीही ठाकरे सेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री भरत गोगावले यांच्यावरही अशाच स्वरूपाचे आरोप झाले होते.आता रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केले आहे.


राजकारणात आरोप-प्रत्यारोप नेहमीच होत असतात, पण जेव्हा मांत्रिक, जादूटोणा, काळी विद्या, तांत्रिक शक्ती या गोष्टी चर्चेत येतात, तेव्हा एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच उभा राहतो की, ‘लोकशाही चालवणारे नेते, तंत्रावर चालतात की मंत्रावर?’


महाराष्ट्रात नक्की चाललंय काय… रामदास कदम यांचे हे आरोप किती खरे आहेत? त्यांच्याकडे खरोखरच पुरावे आहेत का? हे लवकरच उघडकीस येईल की गुलदस्त्यातच राहिल?

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती