पुण्यात उबाठाला धक्का, महादेव बाबर करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे: पुण्यातल्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. उबाठा गटाचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) अजित दादांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते उद्या आपल्या काही सहकार्यांसोबत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्काच बसणार आहे.


महादेव बाबर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते उद्या अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्यांचा मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.


महादेव बाबर यांच्या पक्षप्रवेशाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. महादेव बाबर यांच्या सोबत निलेश मगर, योगेश सासणे तसेच मोठ्या संख्येने उबाठा गटातील अनेक मंत्री राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला हा मोठा धक्का आहे.



महादेव बाबर यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय?


महादेव बाबर हे ठाकरे गटात तर होते, पण हवे तितके सक्रिय नव्हते. त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची होती. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही जागा आपले शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासाठी राखून ठेवली. त्यामुळे महादेव बाबर नाराज झाले होते. नाराज महादेव बाबर यांनी महाविकास आघाडीचे काम देखील केलं नव्हतं. याचा फटका प्रशांत जगताप यांना निवडणुकीत बसला होता आणि त्यांचा पराभव देखील झाला होता.


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर महादेव बाबर शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र बाबर यांच्या प्रवेशाला शिंदे गटातील हडपसरमधील स्थानिक नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून, आपले नशीब आजमावणार आहेत.


Comments
Add Comment

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या