हुश्श! इराणकडून युद्धविरामाची घोषणा

  35

तेहरान: इस्रायल आणि इराणमध्ये मागच्या १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील युद्धविरामाचा दावा केल्यानंतरही इराणकडून इस्रायलच्या दिशेने हल्ले करण्यात आले होते, तसेच हे युद्ध सुरूच ठेवण्याचे जाहीर करण्यात आले होते, यामुळे युद्धविरामाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र या गोंधळानंतर अखेरीस इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून युद्धविरामाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. तर इस्रायलनेही इराणच्या हल्ल्यांबाबत दिलेला अलर्ट मागे घेतला आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यस्थी करत दोघांमध्ये सीजफायर झाल्याची घोषणा सोशल मीडिया द्वारे केली होती. मात्र त्यानंतरही इराणकडून इस्रायलवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे हा संघर्ष नेमका थांबला की नाही, याबद्दल प्रचंड गोंधळ दिसून आला. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर इराणने तासाभरात तीन क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे इस्रायल डिफेन्स फोर्सकडून सांगण्यात आले. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर इराणने युद्धविराम लागू केला आहे.



अखेरचा हल्ला करत युद्धविरामाची घोषणा 


युद्धविरामाची घोषणा करण्यापूर्वी या संघर्षातील अखेरचा हल्ला आपण केल्याचा दावा इराणने केला आहे. या हल्ल्यापूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आमचं शक्तिशाली लष्कर अखेरपर्यंत इस्रायलला त्याच्या हल्ल्यांची शिक्षा देईल, असा इशारा दिला होता.



युद्धबंदीनंतर इराणचा मोसादला दणका


युद्धबंदी झाल्यानंतर इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला दणका दिला आहे. इराणने आपल्या देशातील मोसादच्या ६ हेरांना अटक केली आहे. या सर्वांवर सायबर स्पेसद्वारे मोसादला गुप्तचर माहिती पाठवल्याचा आरोप आहे. इराणने या हेरांना आता कायदेशीर खटल्यासाठी पाठवले आहे. मेहर न्यूजने दिलेल्या माहितीनुसार सर्व 6 हेरांना इराणच्या हमदान प्रांतातून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणची गुप्तचर संस्था या हेरांना पकडण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र युद्धबंदीनंतर या हेरांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र मोसाद किंवा इस्रायलने आतापर्यंत यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.


गेल्या १३ जून रोजी सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत इराण आणि इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यात इ्स्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान या अणुकेंद्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याशिवाय इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणमधील अनेक संशोधक आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इस्रायलला त्याच्या शेजारील आणि मित्रदेशांकडूनही म्हणावी तशी साथ मिळाली नाही. रशिया आणि चीनने नैतिक पाठिंबा दिला पण तेही सक्रियपणे इराणच्या पाठीशी उभे राहिले नाही.



Comments
Add Comment

सूर्यावर वादळवारे होतात का?

कथा : प्रा. देवबा पाटील सूर्यावर हायड्रोजन व हेलियममध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असल्यामुळे त्या

रत्नागिरीच्या रस्त्यांवर लवकरच धावणार ई-बसेस, एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे वाटचाल

एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून,

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने

रत्नागिरीत भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, एक गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार?

प्रतिनिधी:अमेरिकेन भारतावर अतिरिक्त टेरिफ कर लावल्यानंतर आता त्याचे पडसाद भारतातील जनसामान्य व विविध