संगमनेर खुर्द येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

  56

१० जण ताब्यात, तर ५ लाखांचा मुद्देमाल जप्त


संगमनेर : संगमनेर शहरालगत असलेल्या संगमनेर खुर्द येथे प्रवरा नदीच्या मोठ्या पुलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये मध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिस पथकाने छापा टाकत १० जणांना ताब्यात घेत ५ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई रविवार दिनांक २२ जून रोजी पावणे सहा वाजेच्या दरम्यान करण्यात आली.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरालगत असलेल्या संगमनेर खुर्द येथे प्रवरा नदीच्या मोठ्या पुलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये मध्ये काही जण अवैधरित्या पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना समजली. माहीती समजताच त्यांनी व त्यांच्या पोलीस पथकाने वरील ठिकाणी रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता छापा टाकला असता या छाप्यात अवैधरित्या जुगार खेळत असलेले अनिल एकनाथ राक्षे

(वय ४९ वर्षे, रा.संगमनेर खुर्द ता संगमनेर), शिवाजी छबु चव्हाण, वय ४२ वर्षे रा.अकोले नाका, संगमनेर ता. संगमनेर), शाम दामोधर बेल्हेकर (वय ४० वर्षे रा साईमंदिराजवळ, संगमनेर ता संगमनेर), याहीद अजिज पठाण (वय ३७ वर्षे रा सय्यद बाबा चौक, संगमनेर ता संगमनेर) , राजेंद्र तुकाराम जोर्वेकर (वय ५२ वर्षे रा एकता नगर, घुलेवाडी ता. संगमनेर), सुरज प्रताप कतारी (वय ३४ वर्षे रा.कतार गल्ली, संगमनेर ता.संगमनेर), संपत रमेश पवार ( वय ४५ वर्षे रा संजय गांधीनगर, संगमनेर ता. संगमनेर ), तुळशीराम दादा वाळुंज (वय ६५ वर्षे रा कोल्हेवाडी ता. संगमनेर ), अक्षय पंढरीनाथ वाघमारे ( वय २५ वर्षे रा. संगमनेर, ता. संगमनेर) व अक्षय उर्फ मोबी कतारी ( रा. कतारगल्ली, संगमनेर) अशा दहा जणांना ताब्यात घेतले.

याठिकाणी मोटारसायकली, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील दहा जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बंडू टोपे करत आहेत.
Comments
Add Comment

भररस्त्यात हातात चाकू घेऊन मास्क मॅनची दहशत ! नागरिक भयभीत

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या समस्या वाढत आहेत . एकामागोमाग एक अशा गुन्हेगारी घटना पुण्यात घडत असतात .

पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला !

पुणे : पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता अखेर मिटला आहे . काही मंडळांनी मानाच्या गणपतीच्या

सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे भातपिके आडवी

कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून, गेले

सातारा : पावसाचा जोर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर, सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी अखेर

Crime News : साडीने गळफास अयशस्वी मग गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट; CA विद्यार्थ्याच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला

छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगरमधील न्यू शांतीनिकेतन कॉलनी येथे बुधवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. आई व

Beed Crime :उपमुख्यमंत्र्याच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला, नेमकं प्रकरण काय?

बीड:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात