इराण-इस्रायल युद्ध : ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे संभ्रम

पश्चिम आशियातील तणाव: ट्रम्प यांचा दावा, इराणने खोडला


तेहरान : इराण-इस्रायल युद्धानं नवं वळण घेतलंय. इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्रं हल्ले केले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक युद्धविरामाची घोषणा केलीय. मात्र इराणनं अमेरिकेच्या या घोषणेला खोटं ठरवलंय. त्यामुळे इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नेमकं काय घडतंय .


इराण - इस्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतली आणि इराण चवताळला. अमेरिकेनं इराणच्या फोर्डो, इस्फहान आणि नतांझ येथील अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या या हल्ल्यांना इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इराणने कतारमधील अल उदेद हवाईतळावर हल्ला केला. सहा बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. या ठिकाणी अमेरिकेचे १० हजारांहून अधिक सैनिक तैनात आहेत.


इराण आणि इस्रायलमधील युद्धानं जगाचं लक्ष वेधलंय. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या युद्धात अमेरिकेनंही उडी घेतली आणि आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक युद्धविरामाची घोषणा केली. मी इस्रायल आणि इराणचं अभिनंदन करतो. त्यांनी युद्धविरामाला सहमती दर्शवलीय. आता पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल, असं ट्रम्प यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. मात्र युद्धात होरपळलेल्या इराणनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेला खोटं ठरवलं. तर इस्त्रायलनेही युद्धविराम नसल्याचं स्पष्ट केलंय. जोपर्यंत इराण हल्ले थांबणार नाही तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असा पवित्रा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घेतलाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रम निर्माण झालाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अशा वादग्रस्त घोषणा केल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान त्यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याचं जाहीर केलं होतं, जे नंतर खोटं ठरलं. आता इराण-इस्रायल युद्धातही त्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर ट्रम्प यांची ही घोषणा राजनैतिक फायद्यासाठी असू शकते. युद्धविरामासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर घाईघाईने घोषणा करणं धोकादायक असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका सामान्यांना बसलाय. इस्रायलमधील तेल अवीव आणि इराणमधील तेहरानसारख्या शहरांमध्ये नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे शहरांमध्ये सतत सायरन वाजत असल्याचे इस्रायलच्या संरक्षण विभागानं म्हटलंय.



इराण - इस्रायल युद्धात अमेरिकेनं उडी घेतल्याने युद्ध थांबण्याऐवजी युद्धाची व्याप्ती वाढण्याची जास्त शक्यता आहे. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने शक्तिशाली क्षेपणास्त्रं डागून अमेरिकेला इशारा दिलाय. इराणच्या हल्ल्यामुळे कतारमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. इराण-इस्रायल युद्धाने पश्चिम आशियातील परिस्थिती नाजूक बनवलीय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतरही हल्ले सुरू असल्याने युद्ध थांबण्याच्या आशा धूसर आहेत.

Comments
Add Comment

H-1B व्हिसा वाढीव शुल्क फक्त नवीन अर्जदारांनाच! अमेरिकेचे नवे स्पष्टीकरण

वॉशिंग्टन: ट्रम्प यांनी नवीन शुल्क लागू करण्याच्या घोषणेनंतर, H-1B व्हिसाच्या ७०% पेक्षा जास्त वाटा असलेल्या

अमेरिकेसह युरोपमधील तीन प्रमुख विमानतळांवर CYBER ATTACK

वॉशिंग्टन: आज शनिवारी युरोप देशात सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामुळे युरोपीय देशात

२४ तासांत अमेरिकेत परत या! मायक्रोसॉफ्ट, मेटा, ॲमेझॉनचे एच-१बी, एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना आदेश

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा धोरणात बदल केला असून यापुढे एच १बी व्हिसासाठी

सौदी अरेबियासोबतच्या नवीन करारानंतर पाकड्या हवेत! भारताविरुद्ध ओकळी गरळ

भारतासोबत युद्धासारखी परिस्थिती उद्भवली तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे रक्षण करेल, पाकिस्तानच्या संरक्षण

अमेरिकेचा एच-1-बी व्हिसा महागला; भारतीयांना बसणार फटका तर अमेरिकन कंपन्यांसमोर नवी आव्हाने

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे भारतीय कामगारांना फटका बसण्याची शक्यता वॉशिंग्टन: अमेरिकेने H-1B व्हिसा अर्ज

अमेरिका आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर, मुडीजचा इशारा

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन जे काही निर्णय घेत आहे त्याचे प्रतिकूल परिणाम अमेरिकेच्या