यजमान इंग्लंडची सामन्यावर मजबूत पकड

कॅच सुटला अन् डकेटने साधला शतकी डाव


लीड्स : हेडिंगले येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने विजयाच्या दिशेने मजबूत पकड बनवली होती. इंग्लंडचा सलामीवीर डकेट ९८ धावांवर असताना यशस्वी जयस्वालने चूक करत त्याचा सोपा झेल सोडला. जयस्वालची ही चूक भारतीय संघाला महागात पडल. शतकवीर डकेट आणि क्रॉली जोडीने पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची महत्वाची भागीदारी केली. डकेटने शतक तर क्रॉलीने अर्धशतक झळकावत संघाला विजया जवळ नेऊन ठेवले होते.

अखेरच्या दिवशी धावांचा पाठलाग पुन्हा सुरू करण्यासाठी इंग्लंडचे सलामीवीर क्रॉली आणि डकेट मैदानात उतरले. जसप्रीत बुमराच्या हातात चेंडू होता. ८ षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या बिनबाद २७ झाली होती. दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने अचूक टप्प्यावर मारा करत इंग्लिश सलामीवीरांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले होते. वेगवान गोलंदाजांना वापरण्यासाठी चेंडूला चांगली स्विंग मिळत होती. त्यामुळे सध्या नवा चेंडू खेळून काढणे, हेच काम इंग्लंडचे फलंदाज करत होते. झॅक क्रॉली आणि बेन डकेट दडपण झुगारून देण्याच्या प्रयत्नात होते, परंतु मोहम्मद सिराजने आपल्या शिस्तबद्ध गोलंदाजीने धावांवर अंकुश ठेवला होता. तरीही भारतीय संघ पहिल्या बळीच्या प्रतीक्षेत होता.


झॅक क्रॉलीला पायचीत बाद करण्याच्या प्रयत्नात भारताने एक रिव्ह्यू गमावला होता. चेंडू लेग स्टंपपासून मोठ्या अंतराने जात असल्याचे स्पष्ट झाले. क्रॉलीने पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही.


त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने आणखी एक नियंत्रित षटक टाकत बेन डकेटसाठी धावा करणे कठीण केले. दडपण झुगारण्यासाठी या इंग्लिश सलामीवीराला स्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागला. मात्र त्याने कव्हरच्या दिशेने एक शानदार चौकार लगावत संघावरील दडपण काहीसे कमी केले. १७ षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या बिनबाद ५६ झाली होती. २२ व्या षटकात सलामीवीर बेन डकेटने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर त्याने भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले आहे. शार्दुल ठाकूर गोलंदाजीत विशेष प्रभावी ठरला नाही, त्यामुळे सामना आता भारताच्या हातून निसटताना दिसत होता.


त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले. बळी मिळवण्यासाठी भारतीय संघाची अस्वस्थता वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. या षटकात चार धावा आल्या, मात्र इंग्लंडला धावा जमवण्यात कोणतीही अडचण येत नसल्याचे दिसत होते. झॅक क्रॉलीने लगावलेल्या शानदार चौकारासह इंग्लंडने १०० धावांचा टप्पा ओलांडला. या भागीदारीत क्रॉलीने डकेटला उत्तम साथ दिली. यजमान संघ आव्हानाचा पाठलाग करताना अत्यंत मजबूत स्थितीत होता. सामना हातातून निसटत असल्याचे दिसताच गिलने पुन्हा जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्याने अत्यंत नियंत्रित मारा करत केवळ एकच धाव दिली. चहापानापर्यंत इंग्लंडने ३० षटकात ११७ बिनबाद धावा केल्या होत्या.


चहापानानंतर इंग्लंडच्या डावाला पुन्हा सुरुवात झाली, सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी धावसंख्येचा पाठलाग पुढे चालू ठेवला होता. इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीनेही डकेट पाठोपाठ आपले अर्धशतक पूर्ण केले. आतापर्यंत बेन डकेटला उत्तम साथ देत त्याने इंग्लंडच्या डावाला आकार दिला होता. या भागीदारीमुळे इंग्लंडने सामन्यावर आपली पकड अधिक घट्ट केली होती. त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. त्यानंतर


जडेजाच्या ४० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा चौकार लगावत बेन डकेटने आपले शतक साजरे केले. शतक पूर्ण होताच त्याने हवेत हात उंचावून आनंद व्यक्त केला आणि हेल्मेट काढले. डकेटचे हे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक असून, त्याने केवळ १२० चेंडूंत हा टप्पा गाठला. त्याच्या या खेळीने भारतीय संघाच्या आशांवर पाणी फेरले होते. शतकाआधी ९८ धावांवर असताना यशस्वी जयस्वालने डकेटचा अलगदसा झेल सोडला होता. त्याच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे गोलंदाज मोहम्मद सिराज प्रचंड संतप्त झाला होता. त्यानंतर पुढील ४०.५ षटक सुरु असतानाच पावसाने गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला होता.


पाऊस थांबल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली होती. ४३ व्या षटकात क्रॉलीने कृष्णाला चौकार लगावत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दाखवून दिले. मात्र पुढच्याच चेंडूवर प्रसिध्द कृष्णाने क्रॉलीला ६५ धवांवर झेलबाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. क्रॉली बाद झाल्यावर पोप मैदानावर आला होता. जडेजाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत पोपने इंग्लंडला दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. त्यानंतर ४५ व्या षटकात प्रसिध कृष्णाने पोपला त्रिफळाचित करत भारताचे मनोबल उंचावले. पोप बाद झाल्यावर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जो रूट डकेटला साथ देण्यासाठी मैदानात आला होता. मात्र डकेट १४९ धावांवर शार्दूल ठाकुरचा शिकार बनला. त्यापाठोपाठ ब्रुकला ही शार्दूलने खाते न खोलता माघारी पाठवले. लागोपाठ दोन धक्के बसल्याने इंग्लंड संघ सावध झाला होता. इंग्लंडला विजयासाठी अजूनही ११८ धावांची गरज होती. तर भारताला इंग्लंडचे ६ विकेट्स हवे होते.


अखेर चेंडू बदलला


भारतीय खेळाडूंच्या अनेक प्रयत्नांनंतर पंचांनी अखेर चेंडू बदलला. पंचांनी भारतीय खेळाडूंची मागणी मान्य करताच भारतीय खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. मिळालेल्या या संधीचा फायदा उचलून बळी मिळवणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.


बेन डकेटचे विक्रमी खेळी!


भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून बेन डकेटने दमदार शतकी खेळीसह त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. २०१९ नंतर सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने उस्मान ख्वाजाची बरोबरी केली आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहितने २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून ९ शतके झळकावली आहेत. तर श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेने ८ शतके झळकावली आहेत. आता बेन डकेट या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या नावे ६ शतके झळकावण्याची नोंद आहे. तर उस्मान ख्वाजाच्या नावे देखील ६ शतके झळकावण्याची नोंद आहे.


पाच दिवसांत ३ वेळा खांद्याला बांधल्या काळ्या पट्ट्या


भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच पाच दिवसांत तीन वेळा क्रिकेट संघाने खांद्याला काळी पट्टी बांधलेली दिसली. तसेच सामन्याच्या पाचव्या आणि निर्णयाक दिवशीही दोन्ही संघांनी काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. कारण भारताचे माजी गोलंदाज दिलीप दोशी यांचे सोमवारी निधन झाले होते, ते ७७ वर्षांचे होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली त्यांची कारकिर्द चांगलीच बहरली होती. ह्दयविकाच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे मंगळवारी जेव्हा भारताचे खेळाडू मैदानात उतरले तेव्हा त्यांनी काळ्या पट्ट्या बांधल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला

ICC Womens World Cup : भारतीय संघाची विजयी सलामी

गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात

ICC Womens cricket world cup : दीप्ती-अमनजोतची दमदार अर्धशतके; श्रीलंकेसमोर २७० धावांचे आव्हान

गुवाहाटी: आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) च्या पहिल्याच सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेसमोर २७०

आशिया कप ट्रॉफी वादावर बीसीसीआय आक्रमक! विजेत्या संघाला ट्रॉफी का दिली नाही? नक्वींना राजीव शुक्लांचा थेट सवाल

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले असले तरी, पारितोषिक

ICC Womens Cricket World Cup 2025: आता वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

कोलंबो: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025)