कर्करोग ग्रस्त आजीला नातवाने कच-याच्या ढिगा-याजवळ फेकले

माणुसकीला, कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी घटना


मुंबई : माणुसकीला आणि कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. त्वचेच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्याच नातवाने सडलेल्या कच-याच्या ढिगा-यात फेकून दिले होते. पोलिसांनी माणुसकी दाखवत तिला कुपर रूग्णालयात दाखल केले आहे.


शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३२ कडे जाणा-या रस्त्यावरील कच-याच्या ढिगा-यावर वृद्ध महिला सापडली. तिथे त्यांना ६० ते ७० वयोगटातील एक महिला गुलाबी नाईटड्रेसमध्ये कच-याच्या ढिगा-यात असहाय्य अवस्थेत पडलेली दिसली. तिची अवस्था पाहून पोलीस अधिकारीही सुन्न झाले.


पोलीस हवालदार राठोड आणि महिला पोलीस शिपाई निकिता कोळेकर यांनी तातडीने त्या वृद्ध महिलेला पोलीस व्हॅनमध्ये बसवून जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र, तिथे सुविधा नसल्याचे कारण देत रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी तिला कूपर रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी केवळ वरवरची तपासणी करून अधिक सुसज्ज रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तब्बल आठ तासांनंतर, सायंकाळी ५.३० च्या सुमारास, कूपर रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी स्वतः रुग्णालयाच्या कर्मचा-यांशी संवाद साधला, तर दोन्ही पोलीस शिपाई त्या वृद्ध महिलेसोबत थांबून होते. त्या महिलेने आपले नाव यशोदा गायकवाड असे सांगितले. तिने पोलिसांना सांगितले की, मालाडमध्ये आपल्या नातवासोबत ती राहत होती. नातवानेच तिला सकाळी आरेमध्ये आणून कच-याच्या ढिगा-याशेजारी फेकून दिले.


यशोदा यांनी पोलिसांना मालाड आणि कांदिवली येथील दोन पत्ते दिले. पोलीस पथकांनी दोन्ही ठिकाणी जाऊन चौकशी केली, परंतु कोणीही त्यांची ओळख पटवू शकले नाही. तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी तिचा फोटो मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. तिला तेथे कसे आणले गेले, हे शोधण्यासाठी पोलीस आरे जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. आम्ही त्यांच्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अद्याप माहिती मिळालेली नाही. जर कोणी त्यांना ओळखत असेल, तर त्यांनी तात्काळ आरे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले आहे.


आरे पोलिसांनी संबंधित महिलेला आणले. तिच्यावर कान-नाक-घसा विभागाचे डॉ. एन. एस. जी. यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तिच्या नाक व गालावर अल्सेरोप्रोलिफरेटिव्ह वाढ दिसून येत आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिला ‘बॅसल सेल कार्सिनोमा’ असल्याचे प्राथमिक निदान झाल्याचे कूपर रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीची 8 ऑक्टोबरला प्रसिद्धी

मुंबई : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची

UPI UPDATE : UPI वरून 'Collect Request' बंद ,जाणून घ्या नवीन नियम !

मुंबई : UPI वापरकर्त्यांसाठी एका महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरत असाल, तर हे

'ठाकरे ब्रँड'ची भीती की नवी खेळी? शिंदे गटाचा ६० सेकंदाचा टीझर काय सांगतोय?

मुंबई: दसऱ्याचं वातावरण असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सभांचा आणि टीझर्सचा धडाका सुरू आहे.