Dilip Doshi Passes Away : माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन!

मुंबई : भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी रात्री लंडन येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७७ वर्षांचे होते. उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते.


डावखुरे फिरकी गोलंदाज दोशी यांचे निधन हृदयविकारामुळे झाले. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, दोशी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्येच राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नयन इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये सरे आणि महाराष्ट्राच्या सौराष्ट्र संघाकडून खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८९८ बळी घेणाऱ्या दिलीप दोशी यांनी २३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३ वेळा ५ बळी घेतले. एका सामन्यात ६ वेळा १० बळी घेण्याचा विक्रम केला होता.


भारतासाठी खेळण्याव्यतिरिक्त, दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपले कौशल्य दाखवले. त्यांनी सौराष्ट्र आणि बंगाल संघाकडूनही क्रिकेट खेळले. याशिवाय, परदेशी कौंटी क्रिकेटमध्ये दोशी यांनी वॉर्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. अलीकडेच बीसीसीआयने एका समारंभात दोशी यांचा सन्मानही केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही ते उपस्थित होते. दोशी यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिलीप दोशी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नव्हती. त्यांनी १९८० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. दोशी यांनी आपल्या 'स्पिन पंच' या आत्मचरित्रात आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सविस्तर लिहिले आहे.



दोशी यांच्या निधनावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोशी यांच्या फोटोसह सोशल मिडीयात त्यांच्या निधनाची बातमी शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासोबतच सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखील दोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. तसेच फिरकीपटू अनिल कुंबळे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत दोशी यांच्या कारकिर्दीचे स्मरण करत श्रद्धांजली दिली आहे.

Comments
Add Comment

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने