युद्धनौका ‘तामाल’ नौदलात दाखल होणार

नवी दिल्ली : रशियाच्या कॅलिनिनग्रांड येथे १ जुलै २०२५ रोजी आयोजित समारंभात तमाल युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ऍडमिरल संजय जे. सिंग तसेच भारत आणि रशियाचे अनेक उच्चस्तरीय अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.


‘तामाल’ असे नामकरण करण्यात आलेली ही फ्रिगेट, गेल्या 2 दशकांमध्ये रशियाकडून भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या क्रिव्हाक श्रेणीतील आठवी युद्धनौका आहे. ‘तामाल’ ही तुशिल श्रेणीतील दुसरी नौका आहे, जी आधीच्या तलवार आणि तेंग श्रेणीतील नौकांची सुधारित आवृत्ती आहे. तलवार व तेंग या प्रत्येकी तीन-तीन नौकांच्या श्रेण्या होत्या. या व्यापक कराराअंतर्गत, भारतात गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण व रशियन डिझाईन मदतीसह ‘त्रिपुट’ श्रेणीच्या दोन फ्रिगेट्सही बांधल्या जात आहेत. या नौकांच्या मालिकेच्या समाप्तीपर्यंत भारतीय नौदलाकडे एकसमान क्षमतांशी सुसंगत अशा चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एकूण दहा युद्धनौका असतील, ज्यात उपकरणे, शस्त्रास्त्र व सेन्सर प्रणालींची समानता असेल.


तामाल’च्या बांधकामावर भारतीय युद्धनौका देखरेख पथकातील तज्ञांच्या पथकाने निरीक्षण केलं असून, हे पथक भारतीय दूतावास, मॉस्कोच्या अधिपत्याखाली कॅलिनिनग्राड येथे कार्यरत होते. नौदल मुख्यालयात, युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रकांच्या अंतर्गत जहाज उत्पादन संचालनालयाने या प्रकल्पाचे नेतृत्व केले.


‘तामाल’ची निर्मिती रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील यांतर शिपयार्डमध्ये करण्यात आली असून, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांच्या अनुषंगाने परदेशातून प्राप्त होणारी ही शेवटची युद्धनौका ठरणार आहे. या जहाजामध्ये 26 टक्के स्वदेशी घटकांचा समावेश आहे, ज्यात समुद्रावर व जमिनीवर लक्ष्यभेद करणारे ब्रह्मोस लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्रही आहे. या जहाजात आपल्या पूर्ववर्तीशी तुलना करता लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून, उभ्या प्रक्षेपण पद्धतीच्या (VLS) पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्र प्रणाली, सुधारित 100 मिमी तोफ, सुधारित इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड प्रणाली, 30 मिमी क्लोज-इन वेपन सिस्टम (CIWS), जड टॉरपीडोज, त्वरित हल्ला-विरोधी पाणबुडी रॉकेट्स आणि अनेक पाळत ठेवणाकी आणि अग्नि नियंत्रण रडार प्रणाली यांचा समावेश आहे. लढाऊ क्षमतांमध्ये वृद्धी साधण्यासाठी, हवाई प्रारंभिक इशारा व बहुउद्देशीय भूमिका पार पाडणारी हेलिकॉप्टर्स या जहाजावरून तैनात करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तामाल’च्या लढाऊ क्षमतेमध्ये नेटवर्क-सेंट्रिक युद्ध प्रणाली आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींचा अंतर्भाव आहे.. अधिक वजन आणि अधिक मारक क्षमतेच्या गुणोत्तरासह, दीर्घकालीन गस्त क्षमतेसह आणि ३० नॉट्सहून अधिक गती क्षमतेसह ‘तामाल’ आपले सामर्थ्य सिध्द करते.या नौकेवरील सुमारे २५० नौसैनिकांनी सेंट पीटर्सबर्ग व कॅलिनिनग्राड येथील अत्यंत कठीण हिवाळी परिस्थितीत जमिनीवर व समुद्रावर कठोर प्रशिक्षण घेतले आहे. ‘तामाल’ने तीन महिन्यांच्या कालावधीत विस्तृत समुद्री चाचण्या पूर्ण केल्या असून, त्याच्या सर्व प्रणाली, शस्त्रास्त्रे व सेन्सर्स कार्यक्षम असल्याचे सिध्द झाले आहे.

Comments
Add Comment

ओडिशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट बंद

ओडिशा राज्याचा निर्णय नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ओडिशा सरकारने गुरुवारी राज्यात बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, खैनी

जागतिक अर्थव्यवस्थेची माहितीही महत्वाची

विरोधकांच्या टीके फडणवीस यांचे उत्तरला नवी दिल्ली : जगातील राजकीय नेते इथे आहे. जगातील उद्योगांचे नेतृत्व

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा