एसटी महामंडळ आज श्वेतपत्रिका जाहीर करणार

मुंबई : प्रचंड तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून श्वेतपत्रिका सोमवारी (दि. २३ जून) जाहीर करणार आहे. यात एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी व भविष्यातील नियोजनासाठी श्वेतपत्रिका महत्त्वाची ठरणार असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.


एसटी महामंडळाचा तोटा आजच्या घडीला १० हजार कोटींच्या वर गेल्याने महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकांचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी आर्थिक कसरत करावी लागत असून सरकार दरबारी हात पसरावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची देणी, पीएफ निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे.


महामंडळाला इंधन, वस्तू व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणीही द्यायची आहेत. याचा विचार करून एसटी महामंडळाची सध्याची आर्थिक परिस्थिती श्वेतपत्रिकेतून जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली होती. यावर ही श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी एप्रिल महिन्यात दिले होते. त्यानुसार सोमवारी ती महामंडळाकडून जारी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक