Auto Rickshaw Rent Hike: आता शेअर रिक्षाचे भाडे वाढले! सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका

  69

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका बसणार आहे. कारण आता कल्याण आरटीओ क्षेत्रातील प्रवाशांना रिक्षा प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ यांसारख्या शहरांमध्ये शेअर रिक्षाची भाडेवाढ लागू (Share Auto Rent Hike) करण्यात आली आहे. आजपासून (सोमवार, 23 जून 2025) ही नवी भाडेवाढ जाहीर केली जाणार आहे.


कल्याण आरटीओ क्षेत्रात २३ जून २०२५ पासून शेअर रिक्षाचे भाडे ३ ते ५ रुपयांनी वाढले आहे. तीन महिन्यापूर्वी जाहीर झालेली ही वाढ रिक्षांच्या मीटरच्या पुनर्मानांकनामुळे उशीरा लागू झाली. इंधन किमती आणि देखभाली खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक असल्याचे रिक्षा संघटना म्हणतात.



दरवाढीमागील कारण काय?


आधीच दैनंदिन गरजा आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता रिक्षा प्रवासाच्या वाढीव खर्चामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी ताण पडणार आहे. दुसरीकडे, रिक्षा संघटनांनी वाढत्या इंधनाच्या किमती आणि देखभालीचा खर्च लक्षात घेता, ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रवाशांनी ती स्वीकारावी, असे आवाहन केले आहे.



भाडेवाढ तीन महिन्यांपूर्वीच जाहीर, लागू आजपासून


मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ही भाडेवाढ तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केली होती. मात्र, रिक्षांच्या मीटरचे पुनर्मानांकित (recalibrated) पूर्ण न झाल्यामुळे ती आतापर्यंत लागू झाली नव्हती. आता आरटीओ क्षेत्रातील सुमारे 95% रिक्षांचे मीटर पुनर्मानांकित झाल्याने, रिक्षा चालकांनी आजपासून नवीन दर आकारण्यास सुरुवात केली आहे.



किती असणार भाडेवाढ?


शेअर रिक्षाच्या भाड्यात अंतरानुसार 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे, तर मीटरमध्येही प्रति प्रवासामागे 3 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या भाडेवाढीमुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.  दररोज कामावर जाण्यासाठी किंवा इतर प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना आता या वाढीव आर्थिक बोज्याला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

Hinjawadi Accident : बेदरकार मिक्सरने घेतला निष्पाप जीव! हिंजवडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; चालकासह मालकावरही दाखल केला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या पाहता हिंजवडी पोलिसांनी आता

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची