कणकवलीत अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा!

  68

शुभेच्छा देण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोटला जनसागर


ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी


कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांचे ओम गणेश निवासस्थानी आगमन झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्याची जोरदार आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात, तुतारीच्या ललकारीत मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांच्या अमाप जल्लोषी वातावरणात ४३ किलोचा केक कापण्यात आला. यानंतर शुभेच्छा स्वीकारतानाच अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उत्साहात मंत्री नितेश राणेही सहभागी झाले होते.


यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज दळवी, बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, रणजीत देसाई, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, अशोक सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, प्रज्ञा ढवण, राजन परब, विशाल कामत, गणेश काटकर, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, संध्या तेरसे, शेखर गावकर, वकील राजेश परुळेकर, महेश सारंग, एम.के.गावडे, अबिद नाईक, सावळाराम अणावकर, अण्णा कोडे, राजू बेग,आरिफ बगदादी, गणेश तळगावकर, बंड्या नारकर, प्रकाश सावंत, बाबा परब, सोनू सावंत, विठ्ठल देसाई, महेश गुरव, विराज भोसले यांच्यासह राज्य आणि जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच जनसामान्य ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


?si=a5N7hPbiRIL47I-p

सकाळपासून सुरु झालेल्या या उत्साही वातावरणात दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तरीही पालकमंत्र्यांची भेट घेत शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी कमी होत नव्हती. यात पदाधिकारी होते. प्रशासकीय अधिकारीही होते अन आबालवृद्धही. प्रत्येकाला आपलाच वाढदिवस असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.



दरम्यान, सायंकाळी मंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा देणाऱ्यांच्या गर्दीतून बाहेर पडत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत पंचायत समिती कणकवली येथे महिला स्वयंसहाय्यता समूह उत्पादने संकलन व विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहीका लोकार्पणही केले.


कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सोमवारी जिल्हाभरात विविध लोकोपयोगी उपक्रमही वाढदिवसाच्या औचित्यावर सुरू होते.

Comments
Add Comment

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार ?

मुंबई : भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिलेले

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी