IdeaForge : कंपनीचा शेअर १०% उसळला ८ महिन्यातील अप्पर सर्किटवर !

प्रतिनिधी: आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड (IdeaForge Technology Limited) कंपनीच्या समभागाने जबरदस्त उसळी घेतली आहे. कंपनीचा समभाग (Shares)१०.००% उसळला असून प्रति समभाग किंमत ६३१.०५ रूपये बा जारात सुरू आहे. कंपनीचा समभाग १०% उसळल्याने आठ महिन्यांत उच्चांकावर पोहोचला आहे. आठ महिन्यांपूर्वी आलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये उच्चांक गाठल्याने समभाग अप्पर सर्किट (Upper Circuit) वर पोहोचला आहे.कंपनीला प्रामुख्याने १३७ कोटींची मिनी मानवरहित एरिअल वाहन (Mini Unmanned Aerial Vechile UAV) पुरवण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर बाजारात उत्साहाचे वातावरण होते.


यापूर्वी मार्च महिन्यात कंपनीला २६ कोटींचा निव्वळ तोटा (Net Loss) झाला होता. तर मागील वर्षीच्या मार्च महिन्यात कंपनीला १० कोटींचा नफा मिळाला होता. कंपनीला आर्थिक वर्ष २०२४-२५ महिन्यात मिळालेल्या महसूलात तिमाही बे सिसवर ४८.६% घसरण झाली होती तर कंपनीच्या स्थूल मार्जिन (Gross Margin) मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील ४९.९ % वरून घसरत यंदा ३३% प्राप्त झाले होते. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) मध्ये मागील तिमाहीतील ३८.६% तुलनेत घसरण होऊन या तिमाहीत केवळ १४.४% नफा मिळाला होता. तसेच कंपनीच्या करपूर्व नफा (EBITDA) मागील वर्षीच्या २७.४% तुलनेत घसरत या तिमाहीत ३३% मिळाले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या महिन्यात कंपनीच्या समभागात २०% वाढ झाली आहे. मार्च २०२५ पर्यंत, प्रवर्तकांकडे (Promoter)कंपनीमध्ये २९.१७ टक्के हिस्सा होता. आयडियाफोर्ज कंपनी ही स्वदेशी असून यूएव्ही डिझाइन विकास आणि उत्पादन करते.

Comments
Add Comment

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने

बिग बॉस हरुनही मराठमोळा प्रणित मोरे जिंकलाच,सलमान खानसोबत या सिनेमात झळकणार?

Bigg Boss 19 Pranit More मुंबई : बिग बॉस सीझन १९ चा ग्रँड फिनाले नुकसातच झाला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने

PMPML चा पुन्हा कहर; नऊ वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : शहरात अपघातांची मालिका सुरूच असून,एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.