Fact Check: इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून भारतीय एअरस्पेसचा वापर? भारताने फेटाळला दावा

भारताने फेटाळला दावा


नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्त्रायलच्या वादात आता अमेरिकेने उडी घतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणु केंद्रांवर रविवारी(दि.२२) पहाटे हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय एअरस्पेसचा वापर केल्याचा काही सोशल मीडिया हँडलने दावा केला होता. जो भारताने रविवारी खोटा असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे.


अमेरिकेने इंडियन एअरस्पेसचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचा सरकारकडून सांगण्यात आले आहे. एका अधिकृत निवेदनात, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक युनिटने हे दावे "खोटे" असल्याचे खोडून काढले आणि स्पष्ट केले की, "अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी असा दावा केला आहे की अमेरिकेने ऑपरेशन 'मिडनाईट हॅमर' दरम्यान इराणविरुद्ध हल्ल्यांसाठी भारतीय एअर स्पेसचा वापर केला होता. हा दावा खोटा आहे."


पीआयबीने अमेरिकेच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांच्या पत्रकार परिषदेचा हवाला दिला , ज्यात त्यांनी अमेरिकन विमानांनी घेतलेल्या पर्यायी मार्गांची तपशीलवार माहिती दिली आणि हे सर्व दावे निराधार असल्याचे फेटाळून लावले.





दरम्यान, अमेरिकेने रविवारी (२२ जून) पहाटेच्या सुमारास इराणच्या, फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले. यानंतर, इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दरम्यान, ज्या कारवाईअंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला, त्या कारवाईला मिडनाईट हॅमर, असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.


अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. आम्ही इराणी अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केला. मिडनाईट हॅमर ऑपरेशनअंतर्गत नागरिकांना अथवा इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले नाही." याच बरोबर, "इराणने अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या प्रत्युत्तराचा विचार केला, तर त्याला आणखी कठोर उत्तर दिले जाईल," असा इशाराही अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम

Pm Modi Mizoram Visit : मिझोरमला मोठी भेट! रेल्वेपासून हेलिकॉप्टरपर्यंत…पंतप्रधान मोदींच्या घोषणांनी मिझोरम गजबजला!

मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका