ENG vs IND : ११८ धावांची तुफानी खेळी करत ऋषभ पंत झाला बाद, भारताकडे तीनशे पार आघाडी

  111

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. मात्र या दिवसाची सुरूवात चांगली राहिली नाही. सुरूवातीला गिल ८ धावांवरच बाद झाला. टीम इंडियाचे तीन विकेट पडले होते. मात्र यानंतर पंत आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सांभाळला. भारताने ऋषभ पंत आणि केएलच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ३००हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.


केएल राहुल आणि करूण नायर खेळत आहेत. पंत ११८ धावा करून बाद झाला तर केएल राहुल शतकी खेळी करून नाबाद आहे. पंतने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. पंतने पहिल्या डावात १३४ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात पंतने १४० बॉलमध्ये १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या.


या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाला केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती.

Comments
Add Comment

संघाला तारणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे द्विशतक थोडक्यात हुकले

श्रेयस अय्यर २५ तर, जैस्वाल अवघ्या चार धावांवर बाद मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सध्या सुरू असून

आयपीएल अध्यक्षपदासाठी संजय नाईक आणि राजीव शुक्ला यांच्यात चुरस!

मुंबई (प्रतिनिधी) : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल

आशिया कपमध्ये कोण असणार भारताचा स्पॉन्सरर ?

मुंबई : आशिया कप स्पर्धेपूर्वी संसदेत एक बिल पास झाले आणि बीसीसीआयच्या जर्सी स्पॉन्सरला गाशा गुंडाळावा लागला.

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल

रोहित शर्माने घटविले तब्बल २० किलो वजन

मुंबई : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय

टी-२० वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.