ठाण्यात अवघ्या २० लाखांत स्वप्नातले घर

म्हाडाकडून तब्बल ६२४८ घरांसाठी लॉटरी


ठाणे  : ठाण्यामध्ये घर घेण्याचा विचार करत करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. म्हाडा (महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी) कडून ठाण्यात २० लाख रूपयांच्या आत घर मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी प्रथानमंत्री आवास योजना अंतर्गत घरांच्या किमती ठरवल्या जाणार आहेत. शिरगाव आणि खोनी भागात असणाऱ्या ६२४८ घरांच्या किमतीमध्ये बदल करण्यात आला आहे. फस्ट कम फस्ट सर्व्ह या अंतर्गत ठाण्यामध्ये म्हाडा कोकण बोर्ड ६२४८ घरांची विक्री करणार आहे.


ठाण्यातील शिरगांव येथील म्हाडाच्या ५२३६ घरांच्या सुधारित किंमतीला मान्यता दिली आहे. १९ लाख २८ हजार रूपयांमध्ये घर मिळणार आहे. खोणी येथे १.१२ घरांच्या किंमतीमध्ये १ लाख रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आता येथील म्हाडाचे घर १९ लाख ११ हजार रूपयांना मिळेल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (आयएएस) यांनी सांगितले.


ठाण्यामध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असेल, असे म्हाडा कोकण बोर्डाच्या अधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले. या योजनेसाठी कोणतीही डेडलाईन नाही, सर्व घरांची विक्री होईपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येकाचं घराचे स्वप्न पूर्ण व्हावं. गरीब आणि मध्यमवर्गीय असणाऱ्यांना फायदा व्हावा, हा म्हाडाचा मुख्य उद्देश आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.


म्हाडाच्या नियमांनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅटेगरीमधील लोकांना या घराचा लाभ घेता येऊ शकतो. ६ लाख ते ९ लाख रूपयांच्या घरात कमावणारा प्रत्येकजण एलआयजी श्रेणी अंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतो. ९ लाख ते १२ लाख रूपयांचे वार्षिक उत्पन्न असणारा प्रत्येकजण एमआयजी अंतर्गत अर्ज करू शकतो. तर १२ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारा प्रत्येकजण एचआयजीसाठी अर्ज करू शकतो.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे