गंगापूर धरणातून विसर्ग वाढला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेले चार पाच दिवसात पावसाची संततधार कायम असल्याने , जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे . पाण्याचा साठा वाढल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे .

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहे. आज दुपारपासून धरणातून ६,१६० क्युसेक वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे . यापूर्वी धरणातून ४ हजार क्यूसेक विसर्ग सुरू होता. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे .

गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली


गंगापूर धरणातून मोठ्या प्रमानात होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, रामकुंड परिसरातील पूल आणि छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे. गोदावरी नदीला पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या आहे.

पेरणीची कामे खोळंबली


ऐन मे महिन्यात शेतीच्या मशागतीच्या वेळी पावसाने हजेरी लावली , मे महिन्यापूर्वी होणारी शेतीची मशागतीची कामे आणि पेरण्या पावसामुळे खोळंबल्या आहेत . शेतीची कामे रखडल्याने आता शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे . पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे . टोमॅटो लागवड व इतर धान्य उत्पादनासाठीच्या कोलमडलेल्या नियोजनातून सावरण्याच्या प्रयत्न शेतकरी करत आहे .
Comments
Add Comment

जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२५; मुलांना तणावापासून दूर ठेवण्यासाठी या सवयी शिकवा.

दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश मानसिक

प्रसिद्ध युट्युबरचा देश सोडून जाण्याचा निर्णय, कारण आले समोर?

मुंबई : युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी तीनमुळे प्रसिद्धीस आलेला अरमान मलिक कायदेशीर अडचणीत सापडल्यामुळे त्याने देश

'या' आसनांमुळे पीसीओएस आणि पीसीओडीला दूर ठेवण्यास होईल मदत!

सध्याच्या धावपळीच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. बाहेरचे अति खाणे, अवेळी जेवणे आणि झोपणे,

बॉलिवूडची ग्लॅम नायिका दीपिकाने अखेर आठ तासांच्या ड्युटीबद्दल सोडले मौन!

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोण मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिका आई

म्हाडाला अर्जाच्या विक्रीतून मिळाले ८ कोटी

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या कोकण मंडळांच्या घरांसाठी येत्या शनिवारी दि. ११ ऑक्टोबरला ठाण्यामध्ये संगणकीय

टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी !

मुंबई (प्रतिनिधी) : आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रं आणून देत होता. आता,