Nitesh Rane : 'तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला'...अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा टोला

आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? - मंत्री नितेश राणे


सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अबू आझमींनी वारीच्या पालख्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे. राज्यातील हिंदी भाषेच्या शाळेतील बहुपर्यायी निर्णयावरुन आपली भूमिका मांडली. तसेच, समाजवादी पक्षाचे प्रमुख आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार टीका देखील केली. पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते, पण आम्ही तक्रार करत नाही असे म्हणत अबू आझमी (Abu azami) यांनी पंढरीच्या वारीतील पालखीचा आणि रस्त्यावरील नमान पठणाचा संबंध जोडला होता. त्यावरुन, आता वाद निर्माण होत असून अबू आझमींच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे. मंत्री नितेश राणेंनी देखील अबू आझमींवर चांगलाच पलटवार करत, आम्ही हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केले तर? असे म्हटले आहे.




हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न


आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचे फार मोठे षडयंत्र आहे. इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे आखले जातं आहेत त्याला आपण खत पाणी टाकतोय का? आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, पण मराठी सक्ती निश्चित आहे. हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील. तर इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभर लावताय का याचा विचार करुन आंदोलन करावं, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन होत असलेल्या आंदोलनावर दिली आहे. हिंदूंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत असल्याचंही त्यांनी म्हटलं.




वारी वर बोलण्याची हिमंत कोणी करू नये


वारीच्या पालख्यांसंदर्भात अबू आझमींनी केलेल्या वक्तव्यावरूनही राणेंनी संताप व्यक्त केला. दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्यावर आझमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभवर, आमची वारी सुरू झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर्षभर असत नाही पण तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला, त्यावर अबू आझमीने आपलं थोबाड उघडावं, अशा शब्दात नितेश राणेंनी अबू आझमीच्या वक्तव्यावरुन चांगलाच पलटवार केला आहे. तसेच, हे आम्ही इथे खपवून घेणार नाही, आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला. तर, वारी वर बोलण्याची हिमंत कोणी करू नये, आमची वारी अशीच सुरु राहणार असल्याचेही मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय.



संजय राऊतच मोठे गद्दार


सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत आहे. यावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. उबाठा (शिवसेना) आणि उद्धव ठाकरेंची जी अवस्था झालीय, त्याला संजय राजाराम राऊतच जबाबदार आहे. राऊताने स्वतःला आरशात पहावं आणि मग आरोप करावे, अशा शब्दात मंत्री राणेंनी संजय राऊतांवरही जोरदार टीका केली.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही