ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली होती. प्रवासी वाहतुकीतून बाद झालेली एसटी मालवाहू ट्रकमध्ये रुपांतर करण्यात आले होते. परंतू हिच एसटी मालवाहतूक सेवा आता बंद होण्याचा मार्गावर आहे.  एप्रिलच्या २०२४ मध्ये अखेरपर्यंत एसटीला १५ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. एसटी महामंडळाने कमाईपेक्षा खर्च अधिक असल्याने मालवाहतूक सेवा इतिहासजमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच एसटी महामंडळाची मालवाहतूक सेवा सुरु झाल्यानंतर गोदामे उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. त्यामुळे महामंडळाने ३०० हून अधिक जाग्याची पाहणी केली. २०१९ मध्ये आंब्यांच्या सिझनमध्ये पेट्यांची वाहतूक सुरु केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला जास्त फायदा होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.

त्याचबरोबर २०२१ - २०२२ दरम्यान  एसटी मालवाहतूकीची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती.  मात्र मे २०२४  मध्ये साधारणपणे १.५० कोटीचा महसूल मिळवणाऱ्या मालवाहतुकीला २०२५  मध्ये केवळ ४८००० हजार रुपयांचा फायदा झाला.  एसटी महामंडळाला आर्थिक स्थितीची नुकासान पाहता गोदाम उभारण्यात येणार नाही. यापूर्वी महामंडळाने ७२ जागांची निश्चिती केली होती. असं एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.तसेच २०२० मध्ये  ५ लाख टन मालवाहतूक सेवा पुरवून ३७ कोटी एसटीने कमवले होते.  सन २०२९ ते २०२१ च्या कालावधीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून मालवाहतूकीला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत

आरोहच्या अंतर्मनातील महापूर

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल रेगे चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. महापूर नावाचं नाटक तो

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत

आधी वंदू तुज मोरया...

महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.