Mumbai High Court : आईची जात लावण्याची मुलाची मागणी, मुंबई हायकोर्टाने दिला नकार...

मुंबई :  आई वडिल एकत्र राहत नाहीत. वडील स्वतंत्र राहतात, त्यामुळे १८ वर्षीय मुलाने आईची जात लावण्याची  मुंबई हायकोर्टात  मागणी केली होती.  स्वतंत्र राहत असलेले वडील ओबीसी वर्गातून असून आई अनुसूचित प्रवर्गातून आहे. त्यामुळे वडिलांच्या जातीचा फायदा झाला नाही, अस मत मुलाने हायकोर्टात व्यक्त केलं. संबंधित मुलाची मागणी ऐकून हायकोर्टाने युक्तीवाद करण्यास नकार दिला. तसेच मुलाची आई अनुसूचित जातीतील असल्याने मुलाचे कोणतेही नुकसान झाले नाही किंवा मतभेद झाले नाहीत. अस मत न्यायालयाने नोंदवल आहे.

मुलाने वडिलांची जात लावण्यास नकार दिला. १८ वर्षीय मुलाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आईने मुलाच्या जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. अधिकाऱ्यांनीही मुलगा अनुसूचित जातीचा असल्याचं प्रमाणपत्र दिली. पण पडताळणीमध्ये समितीने मुलाचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता.

यानंतर मुलाने हायकोर्टात धाव घेत आईची जात लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. तसेच वडीलांनी आमची कोणतीच काळजी घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या जातीचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. असा दावा मुलाने आपल्या याचिकेत केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वडीलांची जात लावणे मुलाला अनिवार्य आहे.
Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट