मराठी अभिनेत्री गिरीजा ओकच्या पायाला फ्रॅक्चर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओकने अनेक मराठी मालिका, चित्रपट तसेच रंगभूमीही गाजवली आहे. गिरीजा तिच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतेच पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. गिरीजाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहतेही चिंतेत असल्याचं दिसून येत आहे.


गिरीजाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसत आहे. तसेच या फोटोवरून समजत आहे की, तिच्या उजव्या पायाला लागलं आहे. पायाची हालचाल होऊ नये म्हणून तिच्या पायाला प्लास्टर केलं आहे. सध्या अभिनेत्रीवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं कळतंय.


"अलीकडे आयुष्य..., असं कॅप्शन अभिनेत्रीने या पोस्टला दिलं आहे. गिरीजाने तिचे रुग्णालयातील काही पोस्ट शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. यामध्ये पहिल्या फोटोत ती व्हिलचेअरवर बसलेली असून तिच्या पायाला प्लास्टर केल्याचं दिसत आहे. तसेच अभिनेत्रीने तिच्या पायाच्या एक्सरेचा फोटोदेखील शेअर केला आहे. मात्र, गिरीजाच्या पायाला फ्रॅक्चर कसं झालं याबद्दल तिने खुलासा केला नसला तरी तिला तिच्या चाहत्यांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.


अलिकडेच गिरीजा 'जवान' या चित्रपटामुळे चर्चेत होती. जवानमध्ये तिने बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर 'व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटामध्येही तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक करण्यातं आलं.

Comments
Add Comment

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब

MahaRERA : बाधित घर खरेदीदारांना दिलासा; ५,२६७ तक्रारी निकाली, भविष्यातील फसवणूक रोखण्यासाठी महारेराचे कठोर पाऊल

मुंबई: राज्यातील घर खरेदीदारांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी मोहीम हाती

MRVC Vande Metro AC Local : मुंबईकरांनो आता गारेगार प्रवास करा! गर्दीतही आरामदायी अन् वेगवान, मुंबई लोकलमध्ये एसी डबे होणार लवकरच सुरू

मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांना अधिक

E-Water Taxi : काय सांगता? गेटवे ते जेएनपीए फक्त ४० मिनिटांत! ई-वॉटर टॅक्सीची धमाकेदार एंट्री; 'या' तारखेपासून होणार सुरु

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सोयींनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी आता

कुपर रुग्णालयाविरुद्धच्या सततच्या तक्रारीमुळे BMC चा मोठा निर्णय, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा

मुंबई: विलेपार्ले येथील डॉ. आरएन कूपर हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सतत येणाऱ्या

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ