इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

लीड्स : भारताने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या. यानंतर इंग्लंडने तीन बाद २०९ धावा केल्या. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ झाला आहे. काही तासांतच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होईल आणि इंग्लंडचे फलंदाज मैदानात पुन्हा येतील. पण याआधी भारताविषयी एक नवी आकडेवारी समोर आली आहे.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा करुनही भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. एका डावात तीन फलंदाजांनी शतके केल्यानंतरची संघांची एकूण धावसंख्या या श्रेणीत भारताने तळाचे स्थान मिळवले.



तीन खेळाडूंनी शतके केल्यानंतर सर्वात कमी धावसंख्येत सर्वबाद झालेला संघ

  1. ४७१ भारत विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले २०२५

  2. ४७५ दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, सेंच्युरियन २०१६

  3. ४९४ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले १९२४

  4. ४९७ वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, कोलकाता २००२


भारत पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा

टीम इंडियाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतके केली. केएल राहुलने ४२ आणि रवींद्र जडेजाने ११ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज तीन धावा करुन नाबाद राहिला तर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी एक धाव काढली. साई सुदर्शन, करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे तिघे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार जणांना बाद केले. जोश टंगनेही चार जणांना बाद करत त्याला उत्तम साथ दिली. शोएब बशीर आणि ब्रायडन कार्से या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या.
Comments
Add Comment

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या दक्षिण