महापालिकेच्या शाळांमध्ये १० संगणक प्रयोगशाळांचे लोकार्पण

डिजिटल साक्षरतेच्या दिशेने फाऊंडेशनचे महत्त्वपूर्ण पाऊल


मुंबई  : मुंबई स्थित स्नेह आशा फाऊंडेशनतर्फे डिजिटल साक्षरतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महापालिकाक्षेत्रातील विविध शाळांमध्ये १० अद्ययावत संगणक प्रयोगशाळांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या प्रसंगी संस्थेतर्फे शिष्यवृत्ती योजनेच्या तिसऱ्या बॅचमध्ये निवड झालेल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज करण्यात आला.


वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार, अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, उद्योजक निरंजन हिरानंदानी, एमसीजीएमचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, व बांधकाम व्यावसायिक बोमन ईरानी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर यामध्ये शासकीय अधिकारी, शिक्षण तज्ज्ञ, कॉर्पोरेट क्षेत्रातील पदाधिकारी, देणगीदार, समाजसेवक व नामवंत व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


स्नेहआशा संस्थेच्या डिजिटल साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या संगणक प्रयोगशाळांमध्ये एकूण ६००हून अधिक उच्च-क्षमता संगणक बसवण्यात आले असून या उपक्रमाचा ६ वी ते १० वी इयत्तांमधील १५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार आहे. संगणक साक्षरता, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण यासारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे.


या कार्यक्रमात शिष्यवृत्ती योजनेच्या तिसऱ्या बॅच अंतर्गत निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर योजना ‘सरस्वती’, ‘शक्ती’ आणि ‘लक्ष्मी’ अशा तीन उपघटकांमध्ये कार्यान्वित असून विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, मार्गदर्शन, संगणक साहित्य, कोचिंग व करिअर सल्ला यांचा समावेश असलेले व्यापक पाठबळ पुरवले जाते."समाजातील शेवटच्या घटकापर्यंत डिजिटल ज्ञान पोहोचवण्यासाठी स्थापन केलेली संस्था ही केवळ करिअरची संधी नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मभान जागवणारे माध्यम ठरणार आहे.


Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या