ठाणे-पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या उभारणीत ऐतिहासिक टप्पा

साखरे गावात देशातील सर्वात जड बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसवला


ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कामांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मीटर लांबीचा पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा पहिलाच गर्डर बसवण्यात आल्याने हा क्षण अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


हा गर्डर ९७० मेट्रिक टन वजनाचा असून त्यासाठी ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गर्डर्स कोणतेही सांधे न ठेवता, एकसंध स्वरूपात बनवले जातात. प्रकल्पात या प्रकारचे गर्डर्स वापरणे हे कामाच्या जलद गतीसाठी उपयुक्त ठरत असून ते सेग्मेंटल गर्डर्सच्या तुलनेत दहा पट जलद काम पूर्ण करतात. ठाणे ते पालघरपर्यंत बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात येणाऱ्या उंचावरील मार्गिका (व्हायाडक्ट), डोंगरी बोगदे, विशेष मातीच्या संरचना आणि स्थानकांच्या कामांमध्ये सातत्याने प्रगती होत आहे.


शिळफाटा ते झरळी (महाराष्ट्र-गुजरात सीमा) दरम्यान १३५ किमी लांबीच्या उंचावरील मार्गिकेचा समावेश असून यामध्ये १०३ किमी लांबीचा व्हायाडक्ट, २.३ किमी लांबीचे स्टील पूल, १.३ किमी स्थानक परिसर आणि ११ किमी बोगदे व मातीची संरचना यांचा समावेश आहे.


या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात अनेक कास्टिंग यार्ड्स कार्यान्वित असून गर्डर्सची निर्मिती, साठवणूक व बसवणी तंत्रज्ञानयुक्त स्वदेशी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात येते. अलीकडेच विरार व बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबच्या कास्टिंगचे कामही पूर्ण झाले असून, ठाणे-पालघर विभागातून बुलेट ट्रेन प्रकल्पात यशस्वी गतीने पुढे वाटचाल होत आहे.

Comments
Add Comment

ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास

ठाणे ‘सिव्हिल’ने तरुणीला दिले नवे आयुष्य

अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा