लीड्स कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड पिछाडीवर

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे.या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड तीन बाद २०९ धावांवर खेळत आहे. इंग्लंडचा संघ २६२ धावांनी पिछाडीवर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केल्या आहेत.

इंग्लंड तीन बाद २०९ धावा

भारताच्या दमदार खेळीनंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला. त्यांना पहिला धक्का लवकर बसला. झॅक क्रॉली फक्त चार धावा करुन परतला. बेन डकेट ६२ धावा करुन बाद झाला. जो रूटने २८ धावांचे योगदान दिले. ओली पोप १०० धावांवर खेळत आहे. ओलीच्या सोबतीला हॅरी ब्रूक मैदानात आला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद केले आहे.

भारत सर्वबाद ४७१ धावा

लीड्स कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे इंग्लंडला भोवले. भारताने चांगली सुरुवात केली. टीम इंडियाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतके केली. केएल राहुलने ४२ आणि रवींद्र जडेजाने ११ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज तीन धावा करुन नाबाद राहिला तर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी एक धाव काढली. साई सुदर्शन, करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे तिघे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार जणांना बाद केले. जोश टंगनेही चार जणांना बाद करत त्याला उत्तम साथ दिली. शोएब बशीर आणि ब्रायडन कार्से या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

रिषभ पंतची कमाल

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) याने कमाल केली. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने आतापर्यंत सात शतके केली आहे. लीड्स येथे खेळताना त्याने कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक कारकिर्दीतले सातवे शतके केले. या शतकाद्वारे त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (६ शतके) आणि वृद्धिमान साहा (३ शतके) यांना मागे टाकले. शतक पूर्ण करताना पंतने १० चौकार आणि चार षटकार मारले. इंग्लंडमधील पंतचे हे तिसरे कसोटी शतक होते. पंतने परदेशातील भूमीवर एकूण ५ कसोटी शतके आणि मायदेशात २ कसोटी शतके केली आहेत. इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध ३ शतके करणारा पंत हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे.

नाणेफेकीचा कौल

नाणेफेक इंग्लंडने जिंकली. त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा भारताला फायदा झाला. टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. पण तीन फलंदाजांनी शतके केली तरी नंतरच्या फलंदाजांना टिकाव धरणे जमले नाही यामुळे भारताचा डाव ४७१ धावांतच आटोपला.

इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक (२०२५)

पहिली कसोटी: २० ते २४ जून, हेडिंग्ले (लीड्स)

दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)

तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै, लॉर्ड्स (लंडन)

चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, ओव्हल (लंडन)
Comments
Add Comment

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील

Shubman Gill water purifier : मॅचपेक्षा पाण्यावर लक्ष! शुभमन गिलने इंदूरमध्ये नेले ३ लाखांचे वॉटर प्युरिफायर

इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे इंदूरमध्ये होणारा तिसरा

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार