निनावी पत्रामुळे मालाडमधील वीज चोरी उघडकीस

  32

मुंबई : एका निनावी पत्रामुळे मालाडमधील चोरीचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अदानी वीज कंपनीने केलेल्या कारवाईत १६ घरांना अनधिकृत वीज जोडणी दिल्याचे आढळले. याप्रकरणी बांगून नगर पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अदानी वीज कंपनीच्या कार्यालयात ४ जून रोजी एक निनावी पत्र आले. मालाडच्या लिंक रोड येथील शिवधाम ब्लॉकच्या मागील मुथूमरियम रहिवाशी संघ येथील अनधिकृत चाळीना बेकायदेशीर वीज जोडणी दिल्याची माहिती या पत्रात देण्यात आली होती.


तशाच प्रकारची एक तक्रार कंपनीला ऑनलाईन मिळाली होती. दोन्ही तक्रारी एकाच प्रकारच्या होत्या. पत्र आणि तक्रारीची शहानिशा करण्यासाठी दक्षता अधिकारी मिहीर आफळे यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी भेट दिली. येथील १६ घरांना वीज आणि पाण्याच्या पंपाना बेकायदेशीररित्या वीज जोडणी देण्यात आली होती. सुमारे साडेसहा लाखांची २८ हजार युनीट वीज चोरी करण्यात आल्याचे यावेळी आढळले.


बेकायदेशीर वीज जोडणी देणारा आरोपी निलेश हरिजन याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वीज चोरी प्रकरणी दुसरी कारवाई करण्यात आली. आरोपी ओमप्रकाश शर्मा बेकायेदशीरित्या वीज जोडणी घेतल्याचेआढळले. वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई