आषाढीनिमित्त पश्चिम रेल्वे चालवणार उधना ते मिरज दरम्यान विशेष गाड्या

मुंबई  : पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने उधना आणि मिरज दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०९०७९ उधना-मिरज स्पेशल ही गाडी शुक्रवार, ०४ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८० मिरज-उधना विशेष गाडी शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजता उधना येथे पोहोचेल.


ही गाडी बारडोली,व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. ट्रेन क्रमांक ०९०८१ उधना-मिरज स्पेशल ही ट्रेन शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८२ मिरज-उधना विशेष ही गाडी रविवार, ६ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ०९०७९ आणि ०९०८१ या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग २३ जून पासून पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने कळवले आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती