वरंध घाट ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना


अलिबाग :राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५, डीडी राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द)मधील रस्ता हा रस्ता अधिसूचनेच्या दि. ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा कालावधीत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.


या कालावधीत रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांनी केलेल्या विनंतीनुसार तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.


त्यानुसार नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-महाड-माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग वापरावा, तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस
करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार