तालुक्यातील वाळणकोंडी पूल वाहतुकीसाठी बंद

महाड प्रांताधिकाऱ्यांचा नागरिकांना आदेश


महाड : महाड तालुक्यातील वाळणकोंडी येथील देवी वरदायनी मातेच्या मंदिराजवळील तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाची सध्याची अवस्था अत्यंत कमकुवत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली असून या पुलावरील होणारी वाहतूक तातडीने बंद करून या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, असे आदेश महाडचे प्रांताधिकारी यांनी काढले आहेत.


मागील काही वर्षापासून या परिसरात राहणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, सुरत, बडोदा व स्थानिक युवकांच्या वतीने दिवाळी सणादरम्यान या ठिकाणी भव्य प्रमाणात मशाल महोत्सवाचे आयोजन केले जाते. बांधकाम विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग स्थानिक ग्रामस्थांसाठी नजीकचा असल्याने या पुलाचा वापर केला जात होता, मात्र आता मांघरूण व पंदेरी या भागातून लोकांना आपला दैनंदिन प्रवास करावा लागणार असल्याने तो अधिक लांबचा व त्रासाचा होईल, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे.


या ठिकाणी देवीचे भक्त व हजारो पर्यटक प्रतिवर्षी येत असून ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या देखील प्रसिद्ध आहे. देवी वरदायनी मातेला प्रतिवर्षी नवस करणाऱ्या भक्तगणांची संख्या काही हजारोमध्ये आहे. येथील नदीपात्रात असलेले मासे हे अनेक वर्षापासून असल्याची कथा परिसरातील जेष्ठ नागरिकांकडून सांगण्यात येते. कितीही मोठा पूर आला तरीही या परिसरातून हे मासे वाहून जात नाहीत अशी त्यांची महती आहे.


काही दिवसांपुर्वी कुंडमाळा येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटनुसार हा पुल धोकादायक असल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी १८ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान शासनाने हा पूल सद्यस्थितीची तांत्रिक स्थिती लक्षात घेऊन येथून वाहतूक बंद केल्यास पावसाळ्यापश्चात या ठिकाणी नव्या पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

सिडको-नैना क्षेत्रातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन

पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित

विकासकामांना ग्रामस्थांनी निवडले रुपेंद्र मळेकर रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या झालेल्या

उबाठाशी युती राष्ट्रवादीच्या फळाला आली

मुरुडकरांनी जुन्यांना नाकारले तरुणांकडे धुरा! उदय खोत नांदगाव मुरुड : मुरुड नगरपरिषदेची निवडणूक

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली