SEBI Chief Tuhin Kanta Pandey: सेबीचा आक्रमक पवित्रा! 'अनैतिकेवर कडक कारवाई करणार'! तुहिन पांडे यांची स्पष्टोक्ती

'Ease of Doing Business' सुरळीत झाले पाहिजे - पांडे यांचे वक्तव्य 

मुंबई: Financial Express CFO या कार्यक्रमात बोलताना ' आम्ही अनैतिकेतवर (Market Manipulation & Malpratices) वर सेबी अत्यंत कडक कारवाई करणार' अशी चेतावनी दस्तुरखुद्द सेबी (Security Exchange Board of India SEBI) चे नवनिर्वाचित अध्यक्ष तुलिन कांता पांडे यांनी बोलताना दिली आहे. शेअर बाजारात गैरव्यवहार करणारी, तसेच हालचालाखी (Manipulation Practice) करणारे व्यक्ती सेबीच्या रडारवर असणार आहेत. पांडे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की,' जेन्सोलच्या बाबतीत बोलायचे झाले तर कोणीही त्याचा 'व्यवसाय सुलभते' (Ease of Doing Business) शी संबंध जोडू नये.' असे म्हटले आहेत.

बाजारातील गुंतवणूकदारांना कडक संदेश देताना त्यांनी कार्यक्रमात असेही म्हटले की, 'बाजारातील फेरफारबाबत, आपण पुढे खूप कठोरपणे वागू. म्हणजे,आपण यापूर्वीही कठोरपणे वागलो आहोत, परंतु मला वाटते की पुढे जाऊन, बाजारातील फेरफार अशी असेल जी आपण सहन करणार नाही.' असा उजाळा त्यांनी बाजारातील परिस्थितीवर बोलताना दिला आहे. एसएमई आयपीओ (SME IPO) बद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही संबंधित प्रतिक्रिया दिली होती. गे ल्या काही महिन्यांत सेबीने लघु, मध्यम व्यवसाय (SME) आयपीओत चालणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहे. यापूर्वी आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर भलत्याच कामासाठी वापरणे, फंड वळते करणे, आयपी ओतील गैरव्यवहार व होणारी अनियमितता यावर पांडे यांनी भाष्य केले. या सगळ्या प्रकरणांना आळा घालत भारतात सुलभ व्यवसाय व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याची प्रचिती त्यांनी यावेळी दिली आहे.

आयपीओव्यतिरिक्त, इतर डेरिएटिव (Derivatives), इंडेक्स (Index) यामध्ये गैरव्यवहार उघडकीस येत असताना यावर तुहिन कांता पांडे यांनी लक्ष वेधले. तसेच सेबीने याविषयी अत्यंत आक्रमकपणे कारवाईचा निर्णय घेतला आहे.

जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीबाबतीत जे झाले त्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, 'कोणीही हमी देऊ शकत नाही की वाईट वर्तन होणार नाही. कारण लोभ ही अशी गोष्ट आहे जी महाभारत आणि रामायणातही लिहिली गेली आहे आणि आपल्याला अजूनही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते.' नियमन हा प्रत्येक गोष्टीवर उपाय असू शकत नाही. पांडे पुढे म्हणाले, 'या अशा गोष्टी आहेत ज्या केवळ नियमनाने थांबवता येत नाहीत.' त्यांनी सांगितले की अशा घटना नियमनाच्या कमतरतेमुळे घडल्या नाहीत, परंतु अतिशय कठोर नियमांच्या अस्तित्वात असूनही घडल्या' अशा स्पष्ट शब्दात आपली व्यथाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पांडे यांनी आश्वासन दिले की 'चुकीचे काम करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अशी प्रकरणे असू शकतात जी आताही घडत असतील, परंतु लोक पकडले जातील आणि नंतर त्यांना त्रास सहन करावा लागेल,' असे ते म्हणाले आहेत.

नक्की काय आहे Gensol Engineering प्रकरण?

कथित प्रकरणात एप्रिल महिन्यात कंपनीचे प्रवर्तक (Promoter) अनमोल सिंह जग्गी यांनी कथितपणे पीएसयु विना बँक वित्तीय संस्था (PSU NBFC) कडून कर्ज घेत त्यांचा उपयोग संबंधित इलेक्ट्रिक वाहन खरेदी न करता त्या पैशाचा उपयोग वैयक्तिक कामासाठी केला होता असा आरोप जग्गी यांच्यावर होता. त्यावर सेबीने चौकशीचे आदेश दिले होते.
Comments
Add Comment

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई

ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

BMC News : पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Dombivli News : एकाने डोळे झाकले, दुसरा रील काढत होता अन् तिसरा...मोठागाव-माणकोली पुलावर स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवली : स्टंटबाजी आणि रिल्सच्या नादात स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांना आता पोलिसांचा दणका