Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत मोठा अपघात! थोडक्यात बचावली; नेमकं काय घडलं?

  72

Priyanka Chopra: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंगदरम्यान ती एका मोठ्या अपघातातून बचवली आहे. स्वतः प्रियंकाने त्याचा खुलासा केला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाद्वारे, बॉलीवूडमध्ये विशेष छाप सोडल्यानंतर प्रियंका चोप्रा गेल्या अनेक वर्षांपासून हॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत आहे.  प्रियांकाने हॉलिवूड इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली असून, आपल्या कामाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनादेखील आपले चाहते बनवले आहे.

नुकतेच प्रियांकाने तिच्या आगामी चित्रपट हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला. या सिनेमाच्या सेटवर ती थोडक्यात बचावली (Priyanka Chopra Injured While Shooting) असल्याचे तिने सांगितले.

हेड्स ऑफ स्टेटच्या सेटवर अपघात


प्रियांका चोप्राचा आगामी चित्रपट हेड्स ऑफ स्टेट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तिने तिच्या चित्रपटाचे प्रमोशनही सुरू केले आहे. याच दरम्यान तिने तिचे सह-कलाकार जॉन सीना आणि इदरीस एल्बा यांच्यासोबत जिमी फॉलनच्या चॅट शो द टुनाइट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी प्रियंकाने चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत घडलेल्या एका मोठ्या अपघाताबद्दल खुलासा केला. तिने सांगितले की, शूटिंगदरम्यान तिची भुवई कापली गेली होती.

थोडक्यात बचावला डोळा


प्रियांका चोप्राने सांगितले, “कॅमेऱ्यात मॅट बॉक्स होता आणि मला जमिनीवर लोळत पडायचे होते. पाऊस पडत होता. कॅमेरा माझ्या जवळ येणार होता.” देसी गर्लच्या म्हणण्यानुसार, शूटिंगदरम्यान तिला क्लोज शॉट द्यायचा होता आणि कॅमेरा ऑपरेटर काही जास्तच जवळ आला. तीही कॅमेऱ्याच्या थोड्या जास्त जवळ गेली. त्यामुळे कॅमेऱ्याचा कोपरा तिच्या भुवईला लागला आणि तिची अर्धी भुवईच कापली गेली. अभिनेत्रीने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की भुवईच्या जागी तिचा डोळा असता तर मोठा अपघात झाला असता. त्यामुळे थोडक्यात अनर्थ टळल्याचे तिने सांगितले. मात्र या परिस्थितीतही तिने आपले काम पूर्ण केले, कारण तिला पुन्हा पावसात शूटिंग करायचे नव्हते.

प्रियांकाचा आगामी हेड्स ऑफ स्टेट हा एक ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 2 जुलै रोजी स्ट्रीम होणार आहे. प्रियांका या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन

‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा सन्मान आणि उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट