Navi Mumbai Crime : नवी मुंबईत बड्या बापाच्या मुलीनं मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिला हवेत फेकली गेली अन्

  120

पनवेल : न्यू पनवेलमधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या न्यू पनवेल (Panvel) परिसरात एका बड्या बापाच्या मुलीने १९ वर्षीय मुलीने मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल येथील हिरानंदानी पुलावर बुधवारी रात्री ८.४५ वाजता हा अपघात घडला. खारघर पोलिसांनी याप्रकरणी भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे. या मुलीचे नाव तिथी सिंग (वय १९) असे असून ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये रेखा यादव (वय ५०) यांचा मृत्यू झाला आहे. रेखा यादव यांचे पती गोपाल यादव (वय ५४) हे अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झाले आहेत. गोपाल आणि रेखा यादव हे पनवेलमधील देवद भागात वास्तव्याला आहेत. रेखा यादव या घाटकोपरच्या पंतनगर येथील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. बुधवारी रात्री रेखा यादव आणि त्यांचे पती गोपाल यादव स्कुटरवरुन घरी परत येत होते. त्यावेळी शीव-पनवेल महामार्गावरील खारघर परिसरात असणाऱ्या हिरानंदनी पुलावरून त्यांची स्कूटर खाली उतरत होती. त्यावेळी तिथी सिंग ही तिच्या मर्सिडीज कारने भरधाव वेगात येत होती. तिच्या मर्सिडीज बेंझ कारने पाठीमागून यादव दाम्पत्याच्या स्कूटरला धडक दिली.



मर्सिडीज कार वेगात असल्याने रेखा यादव आणि गोपाल यादव दोघेही हवेत फेकले गेले आणि जोरात खाली आपटले. यामध्ये रेखा यादव यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोपाल यादव यांच्या पायाला, हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतर वाहन चालकांनी जखमी गोपाल व त्यांची पत्नी रेखा या दोघांना बाहेर काढून गंभीर जखमी अवस्थेत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रेखा यांना मृत घोषित केले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथी सिंग ही बेलापूरवरुन आपल्या मित्रांना भेटून परत येत होती. त्यावेळी हा अपघात घडला. पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरु आहे. पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. तसेच पोलिसांकडून मर्सिडीज कार चालवणाऱ्या १९ वर्षीय तिथी सिंग हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची