इंडिगोने जाहीर केला मेडे आणि....

बंगळुरू : एअर इंडियाच्या AI 171 या विमानाच्या अपघाताला काही दिवस होत नाहीत तोच इंडिगो या बजेट एअरलाईन कंपनीच्या गुवाहाटी-चेन्नई विमानाने मेडे मेडे मेडे अशी घोषणा केली. विमानातील इंधनाचा साठा कमी असल्याची जाणीव होताच वैमानिकाने मेडे मेडे मेडे अशी घोषणा केली होती. पण विमान बंगळुरू विमानतळावर सुरक्षितित्या उतरले. वैमानिकाने मेडे मेडे मेडे अशी घोषणा केल्यामुळे विमानाचे बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने विमान व्यवस्थित उतरले आणि कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

चौकशी होणार


विमानाचा अपघात झाला अथवा वैमानिकाने 'मेडे' असे नियंत्रण कक्षाला कळवले तर संबंधित विमानात काय घडले याची चौकशी केली जाते. या नियमानुसार इंडिगोच्या संबंधित वैमानिकाची आणि सहवैमानिकाची चौकशी होणार आहे.

'मेडे' म्हणजे काय ?


'मेडे कॉल' हा विमान वाहतूक आणि सागरी वाहतुकीच्या क्षेत्रात सर्वात तातडीचा ​​संकटाचा सिग्नल आहे, जो केवळ जीवघेण्या आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरतात. जिथे तात्काळ मदत आवश्यक असते तिथेच हा शब्द वापरला जातो. विमानाच्या वैमानिकाने / जहाजाच्या खलाश्याने सलग तीन वेळा - "मेडे, मेडे, मेडे" म्हटल्यास सर्वोच्च प्राधान्य देत नियंत्रण कक्षाने तसेच जवळ असलेल्या विमानाने / जहाजाने शक्य ती मदत पुरवणे अपेक्षित आहे. लंडनच्या क्रॉयडन विमानतळावरील रेडिओ अधिकारी फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड यांनी "मायडर" या फ्रेंच वाक्यांशाची ध्वन्यात्मक आवृत्ती म्हणून १९२० मध्ये 'मेडे' अर्थात 'मला मदत करा' अशी संज्ञा विकसि केली.
Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर