IND vs ENG: तीन फलंदाजांची शतके, तरीही टीम इंडियाच्या नावे लाजिरवाणा विक्रम!

  93

टीम इंडिया ४७१ धावांवर सर्वबाद, कसोटी इतिहासातील सर्वात कमी ऑलआउट धावसंख्या


लंडन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG First Test Match) यांच्यात हेडिंग्ले येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. ज्यामध्ये भारताच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावली. पण असे असूनही, भारताचा डाव ४७१ धावांवर घसरला. यामुळे, भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जोडला गेला आहे.


कसोटी इतिहासातील हा चौथा सर्वात कमी ऑलआउट धावसंख्या आहे. यापूर्वी, दक्षिण आफ्रिका (४७५ धावा, २०१६), ऑस्ट्रेलिया (४९४ धावा, १९२४) आणि वेस्ट इंडिज (४९७ धावा, २००२) यांचा समावेश आहे.



भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी


हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी ज्या प्रकारचा खेळ दाखवला होता, दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना तशी कामगिरी करता आली नाही आणि टीम इंडियाने आपले शेवटचे ७ विकेट फक्त ४१ धावांत गमावले. एकेकाळी असे वाटत होते की टीम इंडियाचा स्कोअर ५०० च्या पुढे जाईल, परंतु पहिल्या डावात भारतीय संघ फक्त ४७१ धावाच करू शकला. खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारताचा चौथा विकेट ४३० धावांवर पडला आणि कर्णधार शुभमन गिल १४७ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर विकेट्सची एकच झुंज सुरू झाली.  टीम इंडिया ४७१ धावांवर गुंडाळली गेली.


दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केले आणि टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यापासून रोखले. भारताने आपले शेवटचे ७ विकेट्स ४१ धावांवर गमावले, दुसऱ्या दिवशी भारताने गमावलेल्या ७ विकेट्समध्ये शुभमन गिल, ऋषभ पंत, करुण नायर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश होता. यापैकी करुण नायर आणि बुमराह यांना तर खातेही उघडता आले नाही, तर शार्दुल एक धाव करून तंबूत परतला.  जडेजाने ११ धावांची खेळी केली.



जोश टोंक आणि बेन स्टोक्सने विकेट्स


दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोसळली. कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंगने इंग्लंडकडून शानदार गोलंदाजी केली. या दोघांनी प्रत्येकी भारताचे प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. याशिवाय, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवता आला. = या डावात तीन भारतीय फलंदाजांनी शतके केली, परंतु इतर फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते टीम इंडियासाठी निराशाजनक होते.



गिल, पंत आणि जयस्वालने झळकावले शतक


२०१९ मध्ये सिडनीमध्ये ६२२/७ घोषित केल्यानंतर ही खेळी भारताची परदेशी भूमीवरील सर्वात मोठी पहिली खेळी ठरली आहे. इंग्लंडमध्येही २००७ च्या ओव्हल कसोटीनंतर (६६४ धावा) पहिल्या डावात भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. तथापि, भारतीय फलंदाजांची सुरुवात जबरदस्त होती. या सामन्यात गिलने १४७ धावा केल्या, तर पंतने १३४ धावा केल्या. त्याच वेळी, यशस्वीने १०१ धावा केल्या. परंतु मधल्या फळीतील आणि खालच्या फळीत योगदान न मिळाल्याने संघ मोठ्या धावसंख्येपासून वंचित राहिला. तरीही, ही खेळी तीन शतकांमुळे ऐतिहासिक ठरली.  


 
Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब