Hot Air Balloon Crash: गरम हवेच्या बलूनने आकाशातच घेतला पेट, ८ जणांचा मृत्यू तर १३ जखमी

प्लेन क्रॅशनंतर आता एअर बलून क्रॅश! ब्राझीलमधली घटना


ब्राझील:  ब्राझीलमध्ये गरम हवेच्या बलूनला (Hot Air Balloon Catches Fire in Sky) आग लागल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १३ जण जखमी झाले आहेत. आग लागली तेव्हा गरम हवेचा बलून आकाशात होता.


ब्राझीलमध्ये एक अतिशय दुःखद दुर्घटना घडली आहे. आकाशात असताना गरम हवेचा बलूनला अचानक आग लागली. या गरम हवेच्या बलूनमध्ये बरेच लोक होते. ज्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताला एअर बलून क्रॅश असे देखील म्हंटले जाऊ शकते. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ समोर आहे. ज्यामध्ये गरम हवेचा बलून जमिनीवर पडताना दिसत आहे.



हॉट एअर बलूनमध्ये २१ लोक होते


एपीच्या वृत्तानुसार, दक्षिण ब्राझीलच्या सांता कॅटरिना राज्यात शनिवारी एका गरम हवेच्या बलूनला आग लागली आणि तो आकाशातून जमिनीवर कोसळला.  ज्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तसंस्था G1 ने शेअर केलेल्या फुटेजमध्ये आगीच्या कचाट्यात सापडलेल्या बलूनमधून प्रचंडप्रमाणात धूर निघत असल्याचे दिसून आले. सांता कॅटरिनाच्या लष्करी अग्निशमन दलाने सांगितले की १३ जण बचावले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या बलूनमध्ये पायलटसह २१ जण होते. यापूर्वी देखील अशाप्रकरे एक अपघात घडला होता G1 ने गेल्या रविवारी साओ पाउलो राज्यात एक फुगा पडल्याचे वृत्त दिले होते, ज्यामध्ये २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले.

Comments
Add Comment

US Consulate in Peshawar : अमेरिका पाकिस्तानच्या पेशावरमधील वाणिज्य दूतावास बंद करणार

अमेरिकेने पाकिस्तानमध्ये एक महत्त्वपूर्ण कूटनीतिक पाऊल उचलले आहे. सुरक्षेच्या कारणांचा दाखला देत अमेरिकेने

Iran Attak on UAE : इराणच्या हल्ल्यात ३ भारतीय जखमी, युएईमधील घटनेचा भारताकडून तीव्र निषेध

नवी दिल्ली : अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नसून उभय देशातील तणाव वाढतच असल्याचे

USA Attack on Iran : इराणच्या सात नौका नष्ट केल्या, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन : अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या सात “फास्ट बोट्स” (वेगवान बोटी) नष्ट केल्या आहेत. यावर

Firing near White House : व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, गुप्तचर यंत्रणा आणि हल्लेखोरात चकमक

वॉशिंग्टन, डी.सी. : मागील आठवड्यात व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनरमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली. डोनाल्ड

Met Gala 2026 Ananya Birla : मेट गालावर अनन्या बिर्लाचा जलवा! सुबोध गुप्ताच्या मास्क लूकमुळे सर्वत्र चर्चा

मुंबई : अनन्या बिर्ला हिनं Met Gala 2026 मध्ये पहिल्याच उपस्थितीत जबरदस्त छाप पाडली. मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (Metropolitan

प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या, पाकिस्तानात खळबळ

Idris Tarangzai shot dead : पाकिस्तानमधील प्रसिद्ध धार्मिक गुरु तसेच 'शेखुल हदीस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौलाना मुहम्मद इदरीस