Hot Air Balloon Crash: गरम हवेच्या बलूनने आकाशातच घेतला पेट, ८ जणांचा मृत्यू तर १३ जखमी

प्लेन क्रॅशनंतर आता एअर बलून क्रॅश! ब्राझीलमधली घटना


ब्राझील:  ब्राझीलमध्ये गरम हवेच्या बलूनला (Hot Air Balloon Catches Fire in Sky) आग लागल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १३ जण जखमी झाले आहेत. आग लागली तेव्हा गरम हवेचा बलून आकाशात होता.


ब्राझीलमध्ये एक अतिशय दुःखद दुर्घटना घडली आहे. आकाशात असताना गरम हवेचा बलूनला अचानक आग लागली. या गरम हवेच्या बलूनमध्ये बरेच लोक होते. ज्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताला एअर बलून क्रॅश असे देखील म्हंटले जाऊ शकते. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ समोर आहे. ज्यामध्ये गरम हवेचा बलून जमिनीवर पडताना दिसत आहे.



हॉट एअर बलूनमध्ये २१ लोक होते


एपीच्या वृत्तानुसार, दक्षिण ब्राझीलच्या सांता कॅटरिना राज्यात शनिवारी एका गरम हवेच्या बलूनला आग लागली आणि तो आकाशातून जमिनीवर कोसळला.  ज्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तसंस्था G1 ने शेअर केलेल्या फुटेजमध्ये आगीच्या कचाट्यात सापडलेल्या बलूनमधून प्रचंडप्रमाणात धूर निघत असल्याचे दिसून आले. सांता कॅटरिनाच्या लष्करी अग्निशमन दलाने सांगितले की १३ जण बचावले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या बलूनमध्ये पायलटसह २१ जण होते. यापूर्वी देखील अशाप्रकरे एक अपघात घडला होता G1 ने गेल्या रविवारी साओ पाउलो राज्यात एक फुगा पडल्याचे वृत्त दिले होते, ज्यामध्ये २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या