Habuild International Yoga Day: Habuild कडून १६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम!

हॅबिल्‍डने मोठ्या ऑनलाइन योग सत्राचे आयोजन केले 

प्रतिनिधी: आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करत हॅबिल्‍ड या भारतातील हॅबिट- बिल्डिंग प्‍लॅटफॉर्मने जागतिक टप्‍पा गाठला आहे, जेथे ‘जागतिक स्‍तरावर ऑनलाइन योग क्‍लासमध्‍ये सर्वाधिक उपस्थिती' शीर्षकासाठी नवीन जागतिक विक्रम रचला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. २१ जून रोजी सकाळी अधिकृत वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्षतेखाली हॅबिल्डचे सौरभ बोथरा यांनी आयोजित केलेल्या सत्रात १६९ देशांमधील ७,५२,०७४ पेक्षा जास्त सहभागी व्हर्च्युअल पद्धतीने योगा करण्या साठी एकत्र आले होते.नागपूरहून लाइव्‍ह स्ट्रिमिंग करण्‍यासह जगभरात उपलब्‍ध करून देण्‍यात आलेल्‍या या ४५ मिनिटांच्या सत्रात १०० हून अधिक देशांतील योगसाधक एकत्र आले, ज्यामुळे हा सर्वात सर्वसमावेशक व दूरगामी योग इव्‍हेण्‍ट ठरला असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हा हॅबिल्डचा आतापर्यंतचा पाचवा जागतिक विक्रम आहे. जानेवारी २०२४ मध्ये २,४६,२५२ प्रेक्षकांसह यूट्यूबवर योग लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी सर्वाधिक दर्शकांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला, त्यानंतर ५,९९,१६२ प्रेक्षकांसह योग धड्या साठी एकाच दिवसात सर्वाधिक लाइव्ह दर्शकांचा वर्ल्ड रेकॉर्ड युनियनचा किताब आणि २,८७,७११ सहभागींसह व्हर्च्युअल ध्यान वर्गात सर्वाधिक उपस्थिती असा वर्ल्ड रेकॉर्ड युनियनचा किताब मिळवला. २०२३ मध्ये, हॅबिल्डने वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या व्हर्च्युअल योग वर्गात सर्वात जास्त उपस्थितींची नोंद केली होती, ज्यामध्ये १,३४,०५७ सहभागी उपस्थित होते.

या योग सत्रासह हॅबिल्डच्या २१ दिवसांच्या #हरघरयोग्य उपक्रमाचे समापन झाले, ज्‍याने सहभागींना मोफत, मार्गदर्शन सत्रांद्वारे दररोज योग यांसारखे व्‍यायाम करण्‍यास प्रेरित केले. या उपक्रमामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना मिळण्‍यासोबत विविध वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये, भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये आणि अनुभवी व्‍यक्‍तींमध्‍ये सामुदायिक भावना देखील जागृत झाली अशी भावना कंपनीकडून प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त झाली.

या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत हॅबिल्‍डचे सह-संस्‍थापक आणि प्रमाणित योग प्रशिक्षक सौरभ बोथरा म्‍हणाले, 'या विक्रमामधून सहयोगात्‍मक उद्देशाची क्षमता दिसून येते. जगभरातील लोक योगाद्वारे स्वतःला सिद्ध करण्यासारखी लहान सवय अंगिकारतात तेव्हा त्याचा परिणाम परिवर्तनशील असतो. या मोहिमेवर विश्‍वास ठेवणाऱ्या आणि #हरघरयोग जागतिक चळवळ बनवणाऱ्या प्रत्येक सहभागीचे आम्ही आभारी आहोत.'
Comments
Add Comment

कोजागिरी पौर्णिमा आज! दूध चंद्रप्रकाशात कधी ठेवाल? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

मुंबई: हिंदू धर्मात अश्विन महिन्यातील पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून विशेष महत्त्व

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट