Devendra Fadnavis announcement : विकास आराखड्यातील कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  55

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकाने विकास आराखड्यात कत्तलखाना आरक्षण तयार करण्याता निर्णय घेतलेला होता, त्यापद्धतीने  विकास आराखड्यात राखीव जागा ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोशी आणि तिर्थक्षेत्र अशी ओळख असणाऱ्या आळंदी शहरातील स्थानिक लोकांनी कत्तलखानाला विरोध केला होता. तसेच वारकऱ्यांचा देखील कत्तलखानाला वाढता विरोध पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कत्तलखान्याच आरक्षण रद्द करण्यात येईल अशी वारकऱ्यांना ग्वाही दिली.

दोन दिवसांपूर्वीचं विकास कामाचे उद्घाटन करण्यात आल्याने मोशी आणि आळंदी येथील स्थानिकांनी कत्तलखाना आरक्षण रद्द करावा, अशी मागणी  मुख्यमंत्र्यांच्याकडे केली होेती. पुण्यात मुख्यमंत्र्यांनी  संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे दर्शन घेतले,  त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला.

श्रीक्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या आळंदी देवस्थानाच्या भागात कत्तलखाना आरक्षण समाविष्ट केल्यामुळे वारकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला.फडणवीस म्हणाले, "जो काही विकास आराखडा आहे. त्या विकास आराखड्यामध्ये मोशी-आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. त्याबाबतच्या आरक्षण वगळण्याच्या आदेश मी जिल्हाअधिकाऱ्यांना दिले आहेत. वारकऱ्यांना आणि वारकरी नेत्यांना सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही." मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे वारकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’

बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच पुलाची उभारणी

अभियांत्रिकी क्षेत्रात पूल ठरणार चमत्कार अहमदाबाद : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे.

तुळजाभवानी मातेची तलवार गहाळ! स्थानिक पुजाऱ्यांनी दिली माहिती

तुळजापूर:  तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्र पूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाली आहे, असे

रेव्ह पार्टी करणाऱ्या पतीसाठी कायपण! रोहिणी खडसेंची प्रांजल खेवलकरला वाचवण्यासाठी धडपड

पुणे: पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई