AJC Jewel IPO: परवापासून कंपनीचा IPO शेअर बाजारात येणार,९० ते ९५ रूपये Price Band निश्चित !

  55

प्रतिनिधी:एजेसी जेवेल (AJC Jewel Manufacturers Limited) या कंपनीचा आयपीओ २३ ते २६ जूनपर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होणार आहे. २७ जूनपर्यंत कंपनीचा आयपीओ (IPO) बीएसई एसएमई (BSE SME) या प्रवर्गात दाखल होणार आहे. कंपनीने प्राईज बँड ९० ते ९५ रूपये प्रति समभाग (Share) निश्चित केला आहे.या आयपीओतील गुंतवणूकीकरता किरकोळ घरगुती गुंतवणूकदारांना (Retail Investors) साठी १०८००० रूपयांची गुंतवणूक करावी लागेल असे कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना १२०० समभागांचा गठ्ठा (Lot) खरेदी करावा लागणार आहे.हा आयपीओ फ्रेश इश्यू (Fresh Issue) असणार आहे. १६.२० लाख समभाग या इश्यूतुन विकले जाणार आहे.साधारणतः १ जुलैला कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed)होणार आहे.

या आयपीओत प्रत्येक प्रवर्गाचा (Category)हिस्सा निश्चित करण्यात आला होता.मार्केट मेकर (Market Maker)यांना एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ५.१९% हिस्सा गुंतवता येईल तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Investors QIB)यांना ४६.६७% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर अँकर (Anchor)गुंतवणूकदारांना २७.९३% वाटा,एक्स अँकरसाठी १८.७४% वाटा व किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors)साठी ३३.४८% वाटा उपलब्ध असणार आहे.एकूण विक्रीसाठी १६२०००० शेअर्स उपलब्ध असतील.

पी अशरफ,पी कुन्हीमोहम्मद,फातीमा जासना कोटेकट्टू हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter)आहेत.या आयपीओतील गुंतवणूकीनंतर प्रवर्तकांचा हिस्सा ७६.८५ % वरून ५६.३३% टक्के जाणार आहे.अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीसाठी (Bidding) साठी अंतिम मुदत २० जून देण्यात आली आहे.२०१८ साली या कंपनीची स्थापना एक दागिने कंपनी म्हणून झाली होती.मुख्यतः या कंपनीचा व्यवसाय दागदागिने,ब्रेसलेट, नेकलेस, बांगड्या व तत्सम उत्पादने आहे.मल्लपुरम येथे कंपनीचे मुख्य कार्यालय आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कंपनीला ३१ मार्च २०२४ मधील २४६.८४ कोटींच्या तुलनेत महसूलात (Revenue) मध्ये घट होत ३१ डिसेंबर २०२४ मध्ये १७५.५३ कोटी इतका प्राप्त झाला होता. तर कंपनीला मार्च २०२४ मधील करोत्तर नफा (Profit After Tax PAT) यामध्ये ३.३२ कोटींच्या तुलनेत घटत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत १.८५ कोटी प्राप्त झाला होता. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) हे ५६.८५ कोटी रुपये आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर अथवा विनिमय भांडवली खर्चासाठी,नवीन सामग्री खरेदी करण्यासाठी,थकबाकी चुकवण्यासाठी,व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ