अहमदाबाद विमान अपघात: DGCAचा एअर इंडियाला दणका! एअर इंडियाला 'टाळे' लागू शकते; ३ अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

नवी दिल्ली: अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेत २७० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याने, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला त्यांच्या तीन अधिकाऱ्यांना क्रू ड्युटी शेड्यूल आणि रोस्टरसंबंधित जबाबदाऱ्यांवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत.


DGCA ने एअर इंडियाला गंभीर इशारा दिला आहे की, आगामी काळात जर क्रू शेड्यूलिंग नियम, परवाना किंवा फ्लाइट वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये मोठा दंड, परवाना रद्द करणे किंवा ऑपरेटर परवानग्या रद्द करणे यांचा समावेश असेल, म्हणजेच अशा चुका सुरू राहिल्यास एअर इंडियाला 'टाळे' लागू शकते.



इतकंच नाही, तर DGCA ने एअरलाईनला कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावली आहे. एअर इंडियाने ठरवून दिलेल्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नुसार वैमानिकांना १० तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण करण्यास भाग पाडले आणि १६ व १७ मे रोजी बंगळुरू-लंडन या दोन उड्डाणांमध्ये नियमांचे उल्लंघन केले, याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे.



DGCA च्या आदेशात काय म्हटले आहे?


DGCA ने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, "एअर इंडियाला या तीन अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करावी लागेल आणि त्याचा अहवाल १० दिवसांच्या आत सादर करावा लागेल." या अधिकाऱ्यांना सध्या ऑपरेशनसंबंधित कामावरून हटवून नॉन-ऑपरेशनल भूमिकांवर नियुक्त केले जावे. जोपर्यंत शेड्यूलिंग संबंधी प्रक्रियेत आवश्यक सुधारणा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे अधिकारी विमान सुरक्षा किंवा क्रू संबंधी जबाबदारी असलेल्या पदांवर राहणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे.


DGCA ने ज्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत, त्यात एअर इंडियामध्ये कार्यरत असलेले चूरा सिंग (डिव्हिजनल उपाध्यक्ष), पिंकी मित्तल (मुख्य व्यवस्थापक - ऑपरेशन डायरेक्टोरेट) आणि पायल अरोडा (क्रू शेड्यूलिंग - प्लॅनिंग) यांचा समावेश आहे.


उल्लेखनीय आहे की, १२ जून रोजी अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले होते. हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले. या अपघातात विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला, तर केवळ एक व्यक्ती बचावला. याशिवाय, बीजे मेडिकल कॉलेजमधील २० हून अधिक जणांनाही या अपघातात आपले प्राण गमवावे लागले.

Comments
Add Comment

विजयच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरी, ३० पेक्षा जास्त मृत्यू

करूर : तामिळनाडूतील करूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. तामीळ सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री

पंतप्रधान मोदींच्या हस्ते BSNLच्या स्वदेशी 4G सेवेचे लोकार्पण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’

सोनम वांगचुकचे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन, तपास सुरू

नवी दिल्ली : लडाख या केंद्रशासित प्रदेशातील हिंसेप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या सोनम

बरेलीत दंगल, मौलाना तौकीरला अटक; ४८ तासांसाठी इंटरनेट बंद

बरेली : उत्तर प्रदेशमधील बरेलीत शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर दंगल भडकली होती. नमाज अदा करुन आलेल्यांनी हिंसा

Bullet Train Update : २०२७ मध्ये 'हाय स्पीड' प्रवास! रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा; सुरत-बिलीमोरा टप्पा कधी सुरू होणार?

नवी दिल्ली : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे स्वप्न आता खऱ्या अर्थाने वास्तवाकडे वाटचाल करत

Google 27th Birthday : गूगलचा २७ वर्षांचा प्रवास! 'गॅरेज स्टार्टअप' ते 'टेक्नॉलॉजी पॉवरहाऊस'; डूडलने दिली नॉस्टॅल्जियाची भेट.

कॅलिफोर्निया : टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठे नाव आणि जगातील सर्वात शक्तिशाली सर्च इंजिन असलेल्या गूगलने