Accenture Q3 Results: Accenture कंपनीचा तिमाही निकाल जाहीर निकालानंतर युएसमध्ये ७% शेअर्समध्ये घसरण !

  60

प्रतिनिधी: आयर्लंड डबलिनस्थित बहुराष्ट्रीय कंपनी (MNC) ॲक्सेंचर (Accenture)कंपनीने आपला आर्थिक तिमाही निकाल (Q3 Results) जाहीर केला आहे.कंपनीने शुक्रवारी निकाल जाहीर केल्यानंतर युएस बाजारात कंपनीच्या सम भागात (Shares) मध्ये ११% टक्क्याने घसरण झाली आहे. युएस बाजारात शेवटी ७ % घसरून समभाग स्थिरावला होता. Q3 निकालात कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये ८% वाढ झाल्याने कंपनीचा महसूल १७.७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. युरोप, मध्यपूर्वे, आफ्रिका (EMA) खंडात कंपनीला ६.२३ अब्ज डॉलर व अमेरिकन बाजारात ८.९७ अब्ज डॉलर महसूल मिळाला. आशिया पॅसिफिक बाजारात कंपनीला २.५३ अब्ज डॉलर महसूल मिळाल्याने कंपनीला सर्वाधिक महसूल अमेरिकन बाजारातून आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीच्या स्थूल नफा मार्जिन (Gross Profit Margin) मध्ये तिसऱ्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिस (YoY) ३२.९% वाढ झाली आहे जी मागील वर्षीच्या तिमाहीत ३३.४% होती. कंपनीच्या वार्षिक महसूलातील रेंजमध्ये मागील वर्षीच्या ६ ते ७% तुलनेत ५ ते ७% वाढ झाली आहे.

याआधी तज्ञांनी केवळ १७.३० अब्ज डॉलरपर्यंत कमाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र कंपनीने १७.७ अब्ज डॉलर्स कमावले आहेत. कंपनीच्या फायनांशियल सर्विसेस व हेल्थकेअर व इतर उत्पादनात कंपनीने १३% वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या नव्या ग्राहक बुकिंगमध्ये (Total Booking). मध्ये ६% घसरण झाली आहे. मात्र कंपनीच्या मार्जिनमध्ये १६% वरून १६.८% वाढ झाली आहे. यापूर्वी कन्सल्टिंगवर दबाव असल्याने, एक्सेंचरची वाढ मोठ्या प्रमाणात अजैविक वाढीवर अवलंबून राहण्याची अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली होती. सतत खर्च ऑप्टिमायझेशन उपक्रमांमुळे ऑपरेटिंग मार्जिन २५ बेसिस पॉइंट्सने वाढून १६.७ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. स्पर्धात्मक फायदा राखण्यासाठी अशी धोरणे महत्त्वपूर्ण आहेत. बुकिंगमध्ये घट, विशेषतः कन्सल्टिंगमध्ये, एक्सेंचरच्या महसूल दृश्यमानता आणि आर्थिक वर्ष २६ साठी वाढीच्या गतीबद्दल चिंताही तज्ञांनी याप्रसंगी व्यक्त केली.

दरम्यान, संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५ साठी, आयर्लंड-मुख्यालय असलेल्या फर्मला आता स्थानिक चलनात ६-७% महसूल वाढ अपेक्षित आहे, तर परकीय चलनाचा परिणाम कंपनीतीव वाढीत ०.२% सकारात्मक असण्याची अपेक्षित व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने कंपनी उत्पादनामध्ये झालेली वाढ ही कृत्रिम तंत्रज्ञान (Artificial Intelligence) उत्पादनातील लावलेली सक्षमता कंपनीला फळास आली आहे.
Comments
Add Comment

अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीए आणणार नियंत्रण

अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई : नागरी विकासात शिस्तबद्धता आणि कायदेशीरतेला चालना

आशिष शर्मा यांच्याकडेच बेस्टची जबाबदारी

मुंबई : आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यावर

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या

चीनच्या सैन्यात रोबोटिक लांडग्याचा समावेश, मिनिटाला ६० गोळ्या झाडणार

बीजिंग : चीनच्या सैन्याने आपल्या भात्यात आता लांडग्याच्या रुपातील रोबो आणला आहे. मंगळवारीच चिनी सैन्याने या