कधी आहे आंतरराष्ट्रीय योग दिन ?

मुंबई : दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. नियोजनानुसार दरवर्षी २१ जून रोजी प्राचीन भारतीय योग पद्धतीचे स्मरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. संस्कृतमधून आलेला 'योग' या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा एकत्र येणे असा होतो, जो शरीर आणि चेतनेच्या मिलनाचे प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.


जाणून घ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास !


आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या ६९ व्या महासभेच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणात मांडली होती. "योग ही आपल्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योगामध्ये मन आणि शरीर, विचार आणि कृती यांची एकता आहे - एक समग्र दृष्टिकोन जो आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी मौल्यवान आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही; तो स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकतेची भावना शोधण्याचा एक मार्ग आहे," असे पंतप्रधान मोदींनी त्यावेळी आपल्या भाषणात म्हटले होते. त्यानंतर, ११ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ठराव ६९/१३१ द्वारे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. या ठरावाला विक्रमी १७५ सदस्य राष्ट्रांनी समर्थन दिले.



आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जून हा दिवस का निवडला गेला ?


दरवर्षी २१ जून रोजी दक्षिणायनारंभ होतो. हा उन्हाळी संक्रांतीचा दिवस म्हणून ओळखला जातो. हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. हा दिवस निसर्ग आणि मानवी आरोग्य यांच्यातील प्रतीकात्मक सुसंवाद दर्शवतो आणि अनेक संस्कृतींमध्ये तो महत्त्वाचा आहे.


काय आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम २०२५ ?


आंतरराष्ट्रीय योग दिन सलग ११ व्या वर्षी साजरा केला जात आहे. या वर्षीची थीम "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" ("Yoga for One Earth, One Health.") आहे. वैयक्तिक कल्याण आणि पृथ्वीवरील नागरिकांचे आरोग्य अविभाज्यपणे जोडलेले आहे यावर या थीममध्ये भर देण्यात आला आहे. "स्वतःची काळजी घेताना, आपण पृथ्वीची काळजी घेण्यास सुरुवात करतो, जे वसुधैव कुटुंबकम - जग हे एक कुटुंब आहे या चिरस्थायी भारतीय नीतिमत्तेचे प्रतिबिंब आहे," असे संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनने संयुक्त राष्ट्र सचिवालयाच्या सहकार्याने न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात (UNHQ) एक भव्य आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी ५ ते ६:३० (EDT) दरम्यान होईल हा कार्यक्रम पार पडेल .


भारतात, पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करतील, जिथे आरके बीच ते भोगापुरम पर्यंतच्या २६ किलोमीटरच्या मार्गावर सुमारे तीन ते पाच लाख लोक एकाच वेळी योगासने करतील. हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या योग मेळाव्यांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे.


जाणून घ्या योगाचे महत्त्व ?


योग म्हणजे केवळ शारीरिक हालचाल नव्हे . त्यात आत्म-जागरूकता, ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि जप यांचा समावेश आहे. योगासने करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व