Debt on US : अमेरिकेवर ३७ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त कर्ज, भारताकडूनही घेतले आहे कर्ज

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेवर ३७ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त कर्ज आहे. अमेरिकेने भारत, चीन, जपान या आशियातील देशांकडूनही कर्ज घेतले आहे. दरवर्षी अमेरिका कर्जाचे व्याज भरण्यासाठी एक ट्रिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त पैसे खर्च करत आहे. अमेरिकेच्या कर्जाबाबतची ही आकडेवारी शुक्रवार २० जून २०२५ रोजी जाहीर झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. धातू (कमॉडिटी) स्वरुपातील सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. जगभरातील ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. ब्रिक्स देश स्वतःचे स्वतंत्र चलन कार्यरत करण्याचा विचार करत आहेत. काही देशांनी एकमेकांशी आयात - निर्यात करण्यासाठी फक्त एकमेकांच्या चलनाचाच विचार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे जगाचे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी झाले आणि त्याचवेळी कर्जाचा भार वाढला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने आर्थिक सुधारणा केल्या नाही तर देशावरील कर्जाचा भार २०५५ पर्यंत जीडीपीच्या १५६ टक्के वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलरची तूट दरवर्षी अमेरिकेच्या कर्जात वाढ करत आहे. एकूण कर उत्पन्नाच्या जवळजवळ एक चतुर्थांश भाग आता कर्ज परतफेडीवर खर्च होत आहे. सामाजिक सुरक्षा, वैद्यकीय सेवा, राष्ट्रीय संरक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी कमी पैसा उपलब्ध होत आहे. वाढत्या कर्जामुळे अमेरिकेतील खासगी गुंतवणुकीत घट होण्याचाही धोका आहे. कर्जाचा बोजा नियंत्रित केला नाही तर पुढील दशकात जीडीपी ३४० अब्ज अमेरिकन डॉलरने कमी होण्याचा धोका आहे. यामुळे अमेरिकेतील १२ लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. वेतनवाढ मंदावण्याचीही शक्यता आहे. अमेरिकेच्या जीडीपीमध्ये यंदाच्या वर्षी १.४ ते १.६ टक्के एवढीच वाढ होण्याची शक्यता आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढत असल्यामुळे अमेरिकेच्या धोरणकर्त्यांच्या चिंतेत भर पडत आहे.

भारताकडे सध्या सुमारे २० लाख कोटी रुपयांचे अमेरिकेचे सरकारी रोखे अर्थात यूएस ट्रेझरी बाँड आहेत. सोप्या शब्दात समजून घ्यायचे तर यूएस ट्रेझरी बाँड खरेदी करुन भारताने अप्रत्यक्षपणे अमेरिकेला सुमारे २० लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा