Monday, August 25, 2025

पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...
पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीसांनी दिली.  पुणे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  पुणे शहरातील २० मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यासाठी रस्त्यांवर १३५० पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी असणार आहे त्या ठिकाणी पूर्णपणे बंदी असणार आहे. पुण्यात संध्याकाळी नेहमीच फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडवर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे बदल करणे गरजेचे आहे.  अशी माहिती वाहतुक पोलीसांनी दिली. पुण्यात कुठे असणार वाहतूक बंदी ? पुण्यातील गणेश खिंंड रस्ता पूर्णपणे बंद आहे. तसेच डेक्कन जिमखाना येथील खंडोजी चौक ते वीर चापेकर चौक, गाडगीळ पुतळा चौक, ते स गो बर्वे चौक, आपटे चौक, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, शनिवार चौक, सेवासदन चौक, नेहरु चौक, सोन्या मारुती चौक, संत कबीर चौक ते हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. तसेच हवामान खात्याच्या विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २२ जून २०२५ रोजी दिवे घाट टेकडी भागत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिवे घाटात २२ जून रोजी संध्याकाळी १२ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत दिवे घाट टेकडी परिसरात जाण्यास मज्जाव घालवण्यात आला आहे.            
Comments
Add Comment