Snake in Delhi Metro: 'साप साप...' म्हणत दिल्ली मेट्रोत झाला गोंधळ, निघाले पालीचे पिल्लू

दिल्ली मेट्रोमध्ये 'साप' दिसल्याच्या अफवा, प्रवाशांमध्ये घबराट


नवी दिल्ली: दिल्ली मेट्रोच्या महिला कोचमध्ये साप दिसल्याची अफवा पसरल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यादरम्यान कोचमधील सर्व महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांपैकी अनेकजण  सीटवर चढल्या तर काहींनी इतर कोचमध्ये पळ काढण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेनंतर कोचची तपासणी केली असता, साप काही आढळला नाही, पण त्याजागी पालीचे पिल्लू सापडले. गुरुवारी ब्लू लाईन ट्रेनच्या कोचमध्ये झालेल्या या गोंधळाच्या घटनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये महिला प्रवासी सापाच्या भीतीने घाबरून आरडाओरड करताना दिसून येतात.


दिल्ली मेट्रोच्या महिला कोचमध्ये साप असल्याची बातमी पसरताच, महिला प्रवाशांची उडालेली भंबेरी आणि गोंधळाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला प्रवाशी सापाच्या भीतीने अक्षरधाम मेट्रो स्थानकावर आपत्कालीन थांब्याचे बटण दाबताना दिसून येते. सदर घटनेची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की,  "कोचमधील एका महिलेने 'सापाची शेपटी' दिसल्याचा दावा करत आरडाओरड करायला सुरुवात केली होती, ज्यामुळे  काही मिनिटे हा गोंधळ सुरूच  राहिला. मात्र त्यादरम्यान कोणालाही थेट साप दिसला नाही."


 


सापाच्या भीतीने अनेक महिला प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली, स्वतःला वाचवण्यासाठी अनेकजणी स्टीलच्या सीटवर चढल्या, तर काही दुसऱ्या कोचमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. या गोंधळामध्ये दोन पुरुष एकमेकांशी भिडले, त्यांच्यात फ्रीस्टाइल हाणामारी देखील यादरम्यान झाल्याचे वृत्त आहे.


दिल्ली मेट्रोच्या कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख अनुज दयाल म्हणाले, "एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये साप दिसत नसला तरी, महिलांसाठी असलेल्या कोचमध्ये 'साप' दिसल्याचा दावा केला जात आहे. गुरुवारी संध्याकाळी कोचमधील प्रवाशांकडून अलर्ट मिळाल्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने यासंबंधित त्वरित कारवाई केली."


"अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर ट्रेन रिकामी करण्यात आली आणि ती संपूर्ण तपासणीसाठी डेपोमध्ये पाठवण्यात आली. संबंधित पथकाने डेपोमधील ट्रेन फुटेज आणि कोचची बारकाईने तपासणी करूनही, कोणताही साप आढळला नाही. तथापि, तपासणीदरम्यान एक पालीचे पिल्लू मात्र दिसले," असे ते पुढे म्हणाले.


त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डीएमआरसीच्या वचनबद्धतेबद्दल प्रवाशांना आश्वासन दिले आणि सांगितले की या प्रकरणातही प्रवाशांच्या चिंता दूर करण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात आली आहे. "आम्ही प्रवाशांना सतर्क राहण्याचे आणि अशा कोणत्याही चिंता असल्यास त्वरित कारवाईसाठी आमच्या कर्मचाऱ्यांना कळवण्याचे आवाहन करतो," असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच